शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेची जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी तारेवरची कसरत, पालिका कर्मचाऱ्यांपासून सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 17:26 IST

जनाग्रह अ‍ॅपची प्रसिध्द करण्यास कमी पडलेल्या आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीतही कमी गुण मिळविलेल्या ठाणे महापालिकेने आता या अ‍ॅपची जनजागृती आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच सुरु केली आहे.

ठळक मुद्देआठ हजार ठाणेकरांनीच केले अ‍ॅप डाऊनलोडजनजागृती करण्यात पालिका अपयशीपालिका कर्मचाऱ्यांना दिले अ‍ॅपचे प्रशिक्षण

ठाणे - स्वच्छता अ‍ॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला या अ‍ॅप बाबत ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याने, आता या अ‍ॅपची जनजागृती स्वत:पासूनच करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून पालिका प्रशासनाने सुरु वात केली असून पालिका मुख्यालयात तसेच पालिकेच्या सर्व प्रभाग समितीमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना हा अँप डाउनलोड करण्यापासून सर्व प्रकारची माहिती बुधवारी देण्यात आली. याशिवाय हॉस्पिटल तसेच मॉलमध्ये जाऊन सुद्धा या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.केंद्र शासनाने तयार केलेल्या जनाग्रह या स्वच्छता अ‍ॅप बाबत पालिका प्रशासनाने उदासीन धोरण स्वीकारल्यामुळे जा अ‍ॅपची जास्त प्रसिद्धी होऊ शकली नाही. परिणामी ठाण्यात फार कमी नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर केला आहे. त्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या वतीने या अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी व्यापक स्वरूपात पावले उचलण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ०.१० नागरिकांनी स्वच्छ अ‍ॅप हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करणे आवश्यक आहे. यावर देशात त्या शहराचा रँक किती आहे हे अवलंबून आहे. २०११ च्या जनगणेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८.४१ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे ठाणे शहरातून ४५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी हा स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करणे आवश्यक होते. केंद्र सरकारचा भाग असलेले हे स्वच्छतेचे अ‍ॅप मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात ठाणे शहरात या अ‍ॅपच्या संदर्भात योग्य ती प्रसिद्धी न झाल्याने शहरात मोठ्या संख्येने नागरिकांना या अ‍ॅप बद्दल माहितीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मागील वर्षभरात ४५ हजार नागरिकांनी हा अ‍ॅप डाउनलोड करणे अपेक्षित असताना केवळ ७ हजार नागरिकांनीच हा अ‍ॅप डाउनलोड केला आहे. जर ४५ हजार नागरिकांनी हा अ‍ॅप डाउनलोड केला असता तर १५० मार्क ठाणे महापालिकेला मिळाले असते.उशिरा जाग आलेल्या ठाणे महापालिकेने शहरातील मॉल, हॉस्पिटल तसेच सर्व पालिका कर्मचाऱ्यांना हा अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यास सुरवात केली आहे. जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी केवळ जनजागृती करण्याचेच काम करणार आहेत. हा अ‍ॅप कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा, तक्रारी कशा करायच्या, अशी सर्व माहिती पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात देण्यात आली. आतापर्यंत १० हजार नागरिकांनी हा अ‍ॅप डाउनलोड केला असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी तांत्रिक गोष्टींमुळे सरकारी संकेतस्थळावर ही संख्या दिसत नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान