शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 22:46 IST

नागरिकांनी देखील मास्क, सोशलडिस्टन्सींगचा वापर करावा, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा

ठाणे - कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने सतर्क रहावे. ठाणे महापालिका हद्दीत आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढविणे, रेल्वेस्टेशन, बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी टेस्ट सेंटर सुरू करावेत. ठाणे महापालिकेची पार्किंग प्लाझा व व्होल्टास या कोविड रुग्णालयात सर्व तयारी ठेवणे, औषधसाठा, साफसफाई, लसीकरण आदींबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देत असतानाच ठाणे महापालिका कोविडच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे असेही प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज झालेल्या बैठकीदरम्यान नमूद केले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांची बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके, उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते.

ठाणे महापालिका हद्दीत लसीकरणाबाबत हर घर दस्तक ही मोहिम सुरू असून ती मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वानी मास्क वापरणे गरजेचे असून याची अंमलबजावणी सर्व कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये करण्याच्या सूचना यावेळी सहाय्यक आयुक्तांना दिल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी आरटीपीसीआर सेंटर सुरू करावे. त्याचप्रमाणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई दिवसांतून चार ते पाच वेळा करुन घ्यावी.  गृहसंकुलांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्या ठिकाणच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या बैठकीदरम्यान दिल्या. तसेच बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी देखील नागरिकांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी यावेळी दिल्या.

सद्यस्थितीत मास्क व सोशल डिस्टन्सींगचा वापर होताना दिसत नाही. परंतु कोविडच्या चौथ्या लाटेची पार्श्वभूमी लक्षात घेवून नागरिकांनी गर्दीच्या‍ ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. कोविडवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे, ज्या नागरिकांचे अद्याप एकही लसीकरण झाले नाही अथवा बूस्टर डोस झालेला नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 'हर घर दस्तक' ही मोहिम सुरू असून महापालिकेचे कर्मचारी घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे व ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.     

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या