शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेने दिली २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 15:04 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३१५ अर्जांपैकी २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. शिल्लक मंडळांना सांयकाळ पर्यंत परवानगी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सव मंडळांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेचे पथक सज्जउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडपाची उभारणी करण्याचे पालिकेचे आवाहन

ठाणे - यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळे आणि ठाणे महापालिका यांनी एकत्रित येऊन ज्या पध्दतीने पावले उचलली. त्यामुळेच यंदा कोणत्याही प्रकारचा वाद न होता, गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याच्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यातही किचकट बाबी कमी केल्याने कमी दिवसात मंडप उभारणीला परवानगी दिली जात असल्याने गणेशोत्सव मंडळांच्या वेळही वाचला आहे. त्यानुसार पालिकेला प्राप्त झालेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी आतापर्यंत २७० मंडळांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच उर्वरीत मंडळांनासुध्दा परवानगी दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.              मागील महिन्यात गणेशोत्सव मंडळांच्या आणि पालिका प्रशासन यांच्यात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या मध्यस्तीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांनीसुध्दा महत्वाची भुमिका बजावत गणेशोत्सव मंडळांना लवकरात लवकर परवानगी कशा देता येतील यासाठी पावले उचल्याने यंदा ठाण्यात निर्विघ्न गणेशोत्सव साजरा होणार आहे. महापालिकेकडे प्रभाग समिती स्तरावर एकूण ३१५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत मंडळांना मंडप बांधण्यासाठी याच धर्तीवर परवानगी दिली सांयकाळपर्यंत परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान अधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप बांधताना, मंडप बांधून झाल्यानंतर आणि श्री गणेशाचे आगमन होण्यापूर्वी व श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तपासणी करण्यात यावी असे स्पष्ट करून परिमंडळ उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेले विशेष पथक निर्माण करण्यात आले अहे. या विशेष पथकाद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची तपासणी करण्याची कार्यवाहीसुध्दा सुरु झाली आहे.              उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मंडपांची उभारणी करण्यात आली आहे काय, अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा आहे काय, मंडप बांधताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे किंवा नाही या सर्व बाबींची पडताळणी सुध्दा केली जात आहे. त्याचबरोबर गणेशाच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाहीसुध्दा पूर्ण झाली आहे. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणेGanpati Festivalगणेशोत्सव