शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संपातून माघार, केवळ निदर्शने

By अजित मांडके | Updated: March 14, 2023 16:54 IST

जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाºयांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुन्या पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मात्र महापालिकेतील कर्मचारी संपात सहभागी झाले नसल्याचेच दिसून आले. कर्मचाºयांनी यावेळी केवळ निदर्शने केल्याचे दिसून आले. तसेच यावेळी केवळ आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकूणच महापालिका कर्मचाºयांनी संपातून माघार घेतल्याने पालिकेचा कारभार मात्र सुरळीत सुरु असल्याने ठाणेकरांनी समाधान मानले.  जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाºयांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता. याच पाशर््वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली होती. यानंतर शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये काम करणाºया कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्य सरकारने कर्मचार्यांविरोधात कायद्याचा बडगा उगारला आहे. संपात सहभागी होणाºया सरकारी कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. असे असले तरी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाºयांनी आक्र मक होऊन संपाचे हत्यार उपसले आहे.

दरम्यान वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिकेतील कर्मचाºयांनी मात्र या संपातून काहीशी माघार घेतल्याचे चित्र दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या महापालिकेवर वर्चस्व आहे. त्यामुळेच कदाचित कर्मचाºयांनी माघार घेतल्याची चर्चा सुरु आहे. संपाऐवजी केवळ निदर्शने करून आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याची माहिती म्युन्सिपल युनियन कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. संपाची खूप तयारी करावी लागत असल्यामुळे संपाऐवजी केवळ निदर्शने करणार असल्याचे स्पष्टीकरण संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिले.

दुसरीकडे या संपात सहभागी झाले नसले तरी कोणते कर्मचारी गैरहजर आहेत आणि ते कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत का याची माहिती घेण्याचे काम ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरू होते.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका