शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सहा उमेदवारांची बिनविरोध निवड; मतपत्रिकेत नावे नसल्याने विरोधकांचा आक्षेप

By अजित मांडके | Updated: January 15, 2026 13:26 IST

Thane Municipal Corporation Election: ठाणे महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून, त्यांच्या नावांचा मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिकेत समावेश करण्यात आलेला नाही.

- अजित मांडके ठाणे -  ठाणे महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून, त्यांच्या नावांचा मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिकेत समावेश करण्यात आलेला नाही. या निर्णयावर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असली, तरी निवडणूक यंत्रणेने नियमांनुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांमधून पॅनल पद्धतीने एकूण १३१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी १६ लाखांहून अधिक मतदार मतदान करत आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर सहा जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवार न राहिल्याने संबंधित उमेदवार बिनविरोध निवडून आले.

या पार्श्वभूमीवर मनसे आणि उद्धव सेनेने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे ‘नोटा’सह मतपत्रिकेत असावीत, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र निवडणूक नियमांनुसार बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे मतपत्रिकेत समाविष्ट करता येत नसल्याने निवडणूक प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली. दरम्यान, विरोधकांनी गंभीर आरोप करत उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव, सत्तेचा गैरवापर, प्रशासकीय यंत्रणेचा हस्तक्षेप तसेच आर्थिक आमिषे दिल्याचा दावा केला आहे. काही प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.

या सहा बिनविरोध निवडींमुळे ठाणे महापालिकेतील १३१ जागांपैकी प्रत्यक्ष मतदान १२५ जागांसाठीच होत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी सर्व १३१ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र बिनविरोध निवडींबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सुखदा मोरे, शीतल ढमाले, जयश्री फाटक, राम रेपाळे, एकता भोईर आणि सुलेखा चव्हाण यांचा समावेश आहे. एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या प्रतिनिधीशी बोलताना संबंधित उमेदवारांची नावे मतपत्रिकेत समाविष्ट करण्यात आली नसल्याची माहिती दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Six Thane Candidates Unopposed; Opposition Protests Ballot Names Omission

Web Summary : Six candidates in Thane won unopposed, sparking controversy. Opposition parties protested the omission of their names from ballots. Allegations of coercion and misuse of power arose. Only 125 of 131 seats will now be contested.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Votingमतदान