शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाणे महापालिकेकडून मनसेची मागणी मान्य, विविध योजनांसाठी मिळाली मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:36 IST

ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाला मनसेने केलेली मागणी प्रशासनाने मान्य करुन मुदत वाढ दिली आहे.

ठळक मुद्देठाणे महापालिकेकडून मनसेची मागणी मान्यविविध योजनांसाठी मिळाली मुदत वाढ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ

ठाणे: ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी नागरिकांना मुदत वाढ मिळावी यासाठी मनसेने मागणी केली होती. ही मागणी ठाणे महापालिकेकडून मान्य करण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याचे पालिकेने सांगितले.    ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना तसेच, महिला व बालकल्याण योजना, किन्नर व्यक्तींसाठी योजना राबवित असते. या योजनांचा लाभ घेणाºया लाभार्थींना दिवाळी सणामुळे तसेच शासकीय सुट्टयांमुळे आठवडाभर पात्रतेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मिळालेली नाहीत. पालिकेच्या योजना जनहितासाठी असून ज्येष्ठ, नागरिक महिला यांना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुर्तता करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ देण्याची मागणी मनविसे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका प्रशासनाला केली होती. ही मागणी लक्षात घेऊन पालिकेने तात्काळ मुदत वाढ केली आहे. या आधी १५ नोव्हेंबर पर्यंतची मुदत वाढ होती. परंतू ही वाढ ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली आहे. सायं. ५ वाजेपर्यंत लाभार्थींनी आपले अर्ज प्रभाग समिती कार्यालयात देण्याचे आवाहन पालिकेच्या समाज विकास विभागाने केले आहे.-------------------------------------*एक योजना वगळून इतर योजनांसाठी ही मुदत वाढ आहे. या मुदतवाढीमुळे नागरिकांचा प्रतिसाद जास्त येईल आणि या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचेल- वर्षा दीक्षित, उपायुक्त, समाज विकास विभाग*पालिकेने लोकभावनेचा विचार करुन मनसेची मागणी मान्य केली आहे. मुदतवाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा.- संदीप पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनविसे

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेtmcठाणे महापालिका