शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेचा अजब कारभार : रस्ता उखडण्याचा खर्च ६० लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:37 IST

कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सदस्यांनी केला होता.

ठाणे : कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सदस्यांनी केला होता. परंतु, आता त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे म्हणावे लागणार आहे. पालिकेने आता येथील कांदळवनावर केलेली डेब्रिजची (रस्त्याची) भरणी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ते उचलण्यासाठीदेखील तब्बल ६० लाख २४ हजार ३७५ रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. रस्ता तयार करण्यासाठी सहा लाखांच्या आसपास खर्च आला होता.कांदळवनाच्या ५० मीटर जागेपर्यंत काहीच करण्यात येऊ नये, असे आदेश असतानादेखील पालिकेने आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून कोपरी येथील खाडीकिनारी असलेले अण्णाभाऊ साठे उद्यान विकसित केले होते. यासाठी १० लाखांचा खर्च केला होता. तसेच यामध्ये एक ओपन जिमही विकसित केले होते. त्यामधील साहित्याचा खर्च चार लाख ३१ हजारांच्या घरात होता. परंतु, ही सर्व जागा कांदळवनात येत असून ते नष्ट करून ओपन जिम आणि या भागात एक किमीचा रस्ताही तयार केला होता. यासंदर्भात ठाणे मतदाता जागरण अभियानाचे रोहित जोशी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर, जिल्हाधिकाºयांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, हा सर्व प्रकार घडत असतानाच दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत पुन्हा पालिकेने आमदार निधीतून या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. यासाठी तब्बल ५८.१९ लाखांचा खर्च केला जाणार आहे.आधी पालिकेने या सर्व प्रकरणांतून हात झटकले होते. परंतु, आता पालिकेनेच येथील कांदळवनात झालेला डेब्रिजचा भराव काढण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर आणला आहे. प्रत्यक्षात पालिकेला या ठिकाणी तयार केलेला रस्ता काढायचा आहे. परंतु, त्यासाठी रस्त्याऐवजी त्यांनी डेब्रिजचा आधार घेतल्याचे या दिसून येत आहे. जोशी यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई प्रस्तावित केल्याचे पालिकेने म्हटले आहे.विशेष म्हणजे पालिकेनेच या ठिकाणी रस्ता तयार केला असताना ज्यांनी या ठिकाणी डेब्रिज टाकले, त्या जमीनमालक व दोषींविरुद्ध कारवाई करून दंडात्मक नोटीस बजावण्यात येऊन त्याची वसुली केली जाईल, असेही पालिकेने आता म्हटले आहे. या ठिकाणी पालिका आता वेस्ट प्रोसेसिंग प्रोजेक्ट राबवणार असून ज्या कंपनीकडून हा प्रोजेक्ट राबवला जाणार, तिच्याकडून येथील डेब्रिज उचलले जाणार आहे. त्यानुसार, रस्त्याच्या बाजूची भरणी काढणे व डायघर येथे नेण्यासाठी प्रतिटन ५२५ रुपये खर्च आकारण्यात येणार आहे. त्यानुसार, यासाठी तब्बल ६० लाख २४ हजार ३७५ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आधीच या रस्त्यासाठी आमदार निधीतून सुमारे सहा लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु, तो उखडून त्याचे डेब्रिज उचलण्यासाठी ६० लाखांचा खर्च करण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ठामपाच्या विधी विभागाकडून माहिती मिळेना-वास्तविक, अशा प्रकारचे प्रकल्प राबवताना ठाणे महापालिकेच्या विधी विभागाने त्याची माहिती देणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नाही आणि अशा प्रकारच्या कामात संबंधित कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात मिलीभगत असल्यानेच हे शक्य होत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशातूनच हा खर्च वसूल होणे अपेक्षित आहे.- उन्मेष बागवे, ठाणे मतदाता जागरण अभियान, पदाधिकारी

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका