शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या परिपत्रकाला ठाणे महापालिकेने फासला हरताळ, सण सोहळ्यांवर कोट्यावधींची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:50 IST

शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकालाच ठाणे महापालिकेकडून हरताळ फासला जात असल्याची बाब समोर आली आहे. सण सोहळ्यांवर पालिकेकडून दरवर्षी कोट्यावधींची उधळण केली जात आहे.

ठळक मुद्देमहापालिकेकडून वार्षिक ५७ सण सोहळे होतात साजरेएका कार्यक्रमासाठी पाच लाखांचा खर्चवार्षिक कोट्यावधींचा होतोय खर्च

ठाणे - सण सोहळ्यांवर महापालिकाकांडून कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात येऊ नये असे परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. परंतु या या शासन निर्णयाची पायमल्ली करीत ठाणे महापालिकेमार्फत अशा सण सोहळ्यांवर वार्षिक कोट्यावधींची उधळण सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.                महापालिकांमार्फत विविध प्रकारचे सण, जंयत्ती उत्सव, आदींसह विविध सोहळे साजरे केले जातात. यासाठी कोट्यावधींची उधळपट्टी केली जाते. या संदर्भात एका दक्ष नागरीकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबत निर्णय दिला असून, महापालिकांना त्यांच्याकडील निधी विविध उत्सवांसाठी खर्ची करण्यापूर्वी अधिनियमातील कलम ६३ व ६६ ची पुर्तता होत असल्याची खातर जमा करावी, तसेच अशा सोहळ्यांसाठी महापालिकांनी खर्च करु नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने देखील १० नोव्हेंबर २०१७ रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी असेही त्यात नमुद करण्यात आले आहे.परंतु ठाणे महापालिकेकडून या परिपत्रकाला हरताळ फासण्याचा प्रकार केला जात आहे. शिवाय काही समाजबांधवांकडून देखील ही जंयत्ती साजरी करा, हे सोहळे साजरे झालेच पाहिजेत या समजाचे सोहळे झालेच पाहिजेत अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे एकट्या ठाणे महापालिकेमार्फत वर्षभरात तब्बल ५७ हून अधिक अशा प्रकारचे जंयत्ती, सोहळे साजरे होतांना दिसत आहेत. एक साधा सोहळा अथवा जयंत्ती जर साजरी करायची झाली तर त्यासाठी २० ते २५ हजारांचा खर्च होत आहे. हार, फुले, चहापान, शाल आदींसह इतर खर्च त्यात येत असतो. दुसरकीडे अशा जयंत्ती आणि सोहळ्यासाठीच पालिकेकडून वार्षिक कोट्यावधींची उधळणही केली जात आहे. काही मोठे सोहळे देखील साजरे पालिकेकडून साजरे होतांना दिसत असून यासाठी तब्बल ५ लाखांचा निधी एका कार्यक्रमावर खर्ची होत आहे. त्यामुळे पालिकेने जणू शासनाच्या या आदेशालाच हरताळच फासला की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त