शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ठाणे महापालिकेचे आयुक्त अहंकारी - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:23 IST

ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते.

ठळक मुद्देस्थानिक आमदार समस्या सोडविण्यात अपयशीमनसे मारामारी करणारा  पक्ष

ठाणे - एखादा आमदार ज्यावेळेस आयुक्तांना निवेदन देतो, त्यावेळेस त्यांनी त्याचा सन्मान करीत उभे राहून ते स्विकारणे अपेक्षित असते. परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तसे काहीच केले नाही, ते एक अहंकारी आयुक्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला. या प्रकारचा येत्या अधिवेशनात जाब विचारला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.                                मुंब्य्रातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आझमी हे ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. परंतु त्यांनी आलेल्या अनुभवानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट आयुक्तांवर निषाना साधला. कोणताही आमदार आयुक्तांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्या आमदाराचा सन्मान करणे गरजेचे आहे, आलेल्या आमदाराला दारापर्यंत सोडले पाहिजे, परंतु आयुक्तांनी साधे म्हणने देखील व्यवस्थित ऐकूण घेतले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंब्य्रातील ऊर्द शाळांमध्ये पटसंख्या जास्त असून, विद्यार्थ्यांसाठी शौचालय नसून त्यांना दरवाजे देखील नाही, इमारतींची अवस्था दयनीय आहे. ही माहिती त्यांना दिली असता मी काय करु असे उलट उत्तर आयुक्तांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. वास्तविक आयुक्तांनी या समस्या सोडविणे अपेक्षित असतांना अशा अहंकारी पध्दतीने उत्तरे देणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.                            दुसरीकडे मुंब्य्रातील कब्रस्थानाची जागा प्रशासनाने बदलली आहे. आता जी जागा प्रस्तावित केली आहे, ती जागा येथील रहिवाशांनी खुप लांब पडणार आहे. परंतु आयुक्तांच्या म्हणन्यानुसार आधीची जागा ही सीरआरझेडची असल्यानेच कब्रस्तानची जागा हलविण्यात आली आहे. परंतु त्यांच्या विधानात तथ्य वाटत नसल्याने याबाबत माहिती अधिकार टाकला जाणार असून, त्यात माहिती चुकीची आढळल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. मुंब्य्रात फेरीवाल्यांची समस्या देखील गंभीर स्वरुप धारण करीत असून फुटपाथवरुन चालणे शक्य होत नाही, त्यामुळे फेरीवाला झोन तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली. या समस्या सोडविण्यात स्थानिक आमदार कमी पडत असल्यानेच आता आम्हाला या समस्या सोडवाव्यात लागत असल्याचे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा नामोउल्लेख टाळत आरोप केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळे मल्टीप्लेक्सचा मुद्दा घेऊन ते आता भांडत आहेत. मनसे केवळ गुंडगीरी आणि मारामारी करणारा पक्ष असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. शिवसेना आणि भाजपा जरी वेगळ्या विर्दभासाठी आग्रही असली तरी देखील आम्ही त्यांनी साथ देणार नसल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAbu Azmiअबू आझमी