शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, मुंबईकर चाखणार जव्हार, माेखाड्याची स्ट्राॅबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 23:50 IST

कृषी विभागाचा प्रयाेग यशस्वी; ८६ ठिकाणी २६ हजार राेपांची लागवड

- रवींद्र सा‌ळवेमोखाडा : आदिवासी दुर्गम भाग असलेल्या जव्हार, माेखाड्यात पारंपरिक नाचणी, वरईचे पारंपरिक पीक घेतले जाते. मात्र, शेतीचा हंगाम संपताच येथील शेतकऱ्यांना राेजगाराच्या शाेधात स्थलांतर करावे लागते. त्यामुळे कृषी विभाग शेतातच वेगवेगळे प्रयाेग  करून हे स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तालुका कृषी अधिकाऱी अनिल गावित यांनी या तालुक्यांतील शेतकऱ्यांना एकत्र करून मोखाडा तालुक्यात ४२ ठिकाणी, तर जव्हार तालुक्यात ४४ ठिकाणी ११ एकर क्षेत्रावर जवळपास २६ हजार स्ट्रॉबेरींच्या राेपांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. त्यामुळे काही दिवसांतच मुंबई, ठाणे आणि नाशिककरांना जव्हार-मोखाड्यातील स्ट्रॉबेरी चाखायला मिळणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील यशानंतर कृषी अधिकारी गावित यांनी स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाचा या तालुक्यांत प्रयोग यशस्वी केला आहे.  नव्या तंत्रज्ञानाने केल्या जाणाऱ्या शेतीमुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे स्थलांतर थांबून आदिवासींचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपरिक नाचणी, वरईची शेती करतात. शेती हंगाम संपल्यानंतर राेजगारासाठी मोठ्या प्रमाणावर आदिवासी कुटुंबे शहरामध्ये स्थलांतर करतात. ही समस्या सुटण्यास काही प्रमाणात मदत हाेणार आहे. तालुका कृषी अधिकारी अनिल गावित आणि मंडळ कृषी अधिकारी ऋतुजा कोडलिंगे यांनी त्यांना स्ट्राॅबेरीच्या शेतीची नवी वाट दाखविली आहे. यातून भविष्यात त्यांचे उत्पन्न वाढून त्यांची जीवनशैली सुधारण्यास मदत हाेणार आहे.  कृतिशील प्रयाेगातून आदिवासींचे सक्षमीकरणकृषी अधिकारी गावित यांनी जव्हार आणि मोखाड्याचे भौगोलिक महत्त्व ओळखले. उंच ठिकाणी वसलेले जव्हार हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणचे वातावरण स्ट्राॅबेरी पिकासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी हेरलेे. यासाठी त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना एकत्र करून सापुतारा येथे सहल नेली. तेथे स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले. स्ट्राॅबेरी लागवडीमुळे आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांचे स्थलांतर थांबून आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त हाेत आहे.