शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा : जमदाडे ठरला ‘महापौर केसरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:51 IST

ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे झालेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याने समाधान पाटीलवर मात करून यंदाचा ठाणे महापौर केसरीचा किताब पटकावला.

ठाणे : ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे झालेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याने समाधान पाटीलवर मात करून यंदाचा ठाणे महापौर केसरीचा किताब पटकावला. जमदाडे याला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी चांदीची गदा आणि रोख एक लाख रुपये देऊन गौरवले. उपविजेता ठरलेला समाधान पाटील याला मानचिन्ह व रोख ७५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले.जिल्हास्तरीय प्रौढांमध्ये विविध १० वजनी गटांत ही स्पर्धा पार पडली. सर्व गटांसाठी अनुक्र मे प्रथम पारितोषिक ७,५००, द्वितीय पाच हजार, तृतीय क्रमांकासाठी २,५०० रुपयांची दोन पारितोषिके देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय कुमार गटात ४५ किलो ते ११० किलो वजनी गटात ही स्पर्धा झाली. प्रथम क्र मांकास पाच हजार, द्वितीय तीन हजार, तर तृतीयसाठी १५०० रु पयांची दोन पारितोषिके देण्यात आली. जिल्हास्तरीय महिला गटातदेखील १० गटांत ५० किलोपासून ते ७६ किलो वजनी गटात स्पर्धा पार पडली. या गटात प्रथम पारितोषिक सात हजार, द्वितीय चार हजार, तर तृतीयसाठी २,५०० रुपयांची दोन पारितोषिके देण्यात आली. या सोहळ्यास सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेविका मीनल संख्ये, क्र ीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दीपक वेतकर, ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुरेश ठाणेकर, सचिव रामकांत पाटील, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, पै. रंगराव पाटील उपस्थित होते.३५0 मल्ल सहभागीकोल्हापूरचा कौतुक डाफळे आणि समीर देसाई यांना तृतीय व चतुर्थ क्र मांकांवर समाधान मानावे लागले. त्यांना अनुक्र मे ६० हजार आणि ४० हजार रु पये व सन्मानचिन्ह देण्यात आले. तीन गटांत या कुस्ती स्पर्धा खेळवण्यात आल्या आहेत. जवळपास ३५० मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

टॅग्स :thaneठाणे