ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आता मतदारांचा कौल आज (गुरुवारी) स्पष्ट होणार आहे. ठाणे कुणाच्या वाट्याला जाणार, याकडे मतदारांच्या नजरा खिळल्या आहेत.
मागील महिन्यात २९ एप्रिल रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. ठाणे लोकसभा मतदारसंघात ४९.२३ टक्के मतदान झाले होते. ठाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यात झालेल्या लढतीनंतर निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या क्षणी ‘काँटे की टक्कर’ ठरली होती. त्यामुळे ठाण्याचा खासदार कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे.मताधिक्याने कोण जिंकणारलोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, भाजप-शिवसेना युतीचे खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे आनंद परांजपे यांच्यात लढत आहे. निकालाच्या दिवशी कोणाच्या पारड्यात विजयाचे दान पडते, कोण किती मताधिक्याने जिंकतो, हे स्पष्ट होईल.पिंपरी : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुलात सकाळी आठपासून मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे. मतपेटीत बंद झालेल्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
मावळमध्ये या वेळी यंदा ५९.४९ टक्के मतदान झाले. क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमधील स्ट्राँगरूममध्ये मतपेट्या सील करण्यात आल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणारआहे. बुधवारी मतमोजणीचा आढावा घेण्यात आला आहे.फेरीनिहाय होणार निकालमतमोजणीचे संपूर्ण व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणारआहे. एकाच वेळी मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
श्रीरंग बारणे। शिवसेना : मावळ मतदार संघातून शिवसेनेच श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. भौगोलिक दृष्ट्या अत्यंत क्लिष्ट असलेल्या या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील तीन तर रायगडमधील तीन विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. मावळची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची बनविल्याने याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मावळ मतदारसंघात पनवेल, उरणसह कर्जत, पिंपरी, चिंचवड आणि मावळ या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण २२ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यापैकी १३ लाख ९ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी सरासरी ५९.४५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.