शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने जून अखेरीस केली ७४.४५ कोटी मालमत्ता कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 13:49 IST

ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कर वसुली राबविल्यामुळे यंदा जून अखेरपर्यंत  माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने  ७४.४५ कोटी इतकी विक्रमी करवसुली केली आहे.

ठळक मुद्देयंदा जून अखेरपर्यंत  माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने  ७४.४५ कोटी इतकी विक्रमी करवसुली केली आहे. 29 जून या एका दिवसात या विभागाने 12 कोटी 13 लक्ष एवढी वसुली केली आहे. रोमा बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी एक रकमी 12 कोटी ९३ लक्ष इतकी कराची रक्कम जमा केली आहे.

ठाणे - ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कर वसुली राबविल्यामुळे यंदा जून अखेरपर्यंत  माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने  ७४.४५ कोटी इतकी विक्रमी करवसुली केली आहे. तर 29 जून या एका दिवसात या विभागाने 12 कोटी 13 लक्ष एवढी वसुली केली आहे. गतवर्षी या विभागातर्फे 51 कोटी रुपये कर वसुली झाली होती.

पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाही रक्कम भरल्यास, दुसऱ्या  सहामाहीच्या रक्कमेवर सूट, सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा  मालमत्ताधारकांनी लाभ घेतला आहे.

रोमा बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी एक रकमी 12 कोटी ९३ लक्ष इतकी कराची रक्कम जमा केली आहे. आतापर्यंत या विभागातर्फे 34 .45 कोटी इतकी कराची रक्कम वसूल करण्यात आली आहे. एक कोटी व त्यापेक्षा अधिक रकमेच्या करदात्यांस यावेळी पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त परिमंडळ ३  अशोक बुरपल्ले, उपायुक्त कर ओमप्रकाश दिवटे उपकर निर्धारक व संकलक जी.जी. गोदापुरे, सहाय्यक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर, कर निरीक्षक रमेश दळवी आदींनी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

ठाणे महापालिकेच्यावतीने या आर्थिक वर्षात कर निर्धारण व वसुलीसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये  कस्टमाईज्ड सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमुळे  मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. करदात्यांना आपला कर निर्धारण तपशील पाहणे, डाऊनलोड व कर प्रदान  करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असून करदात्यांना  एसएमएसद्वारे कर  रक्कम जमा झाल्याची खात्री कर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पीओएस मशीनद्वारे विनाशुल्क कर संकलन सुविधा महापालिकेच्या २० कर संकलन केंद्राबरोबरच मोबाईल व्हॅनद्वारे देखील नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे