शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंसाठी ठाण्याची जमीन सुपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:43 IST

मनसेच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधातील राजकारणाकरिता ठाणे जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने आगामी विधानसभेच्या राजकारणावर लक्ष ठेवून राज हे ठाण्यातून खळ्ळ खट्याकचा प्रयोग करतील

ठाणे : मनसेच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधातील राजकारणाकरिता ठाणे जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने आगामी विधानसभेच्या राजकारणावर लक्ष ठेवून राज हे ठाण्यातून खळ्ळ खट्याकचा प्रयोग करतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.महाराष्ट्रात येणारे परप्रांतीयांचे लोंढे हे सर्वप्रथम ठाण्यात येतात व तेथून राज्याच्या अन्य भागात जातात, असे मत त्यांनी शुक्रवारी दादरमधील मुलाखतीत व्यक्त केले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार या महापालिका क्षेत्रात परप्रांतीयांची समस्या अधिक आहे, असे ठाकरे म्हणाले. राज्य सरकार राबवत असलेला मेट्रो प्रकल्प परप्रांतीयांकरिता राबवण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला. मनसेचा परप्रांतीयविरोध कायम असून विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर तो अधिक तीव्र होईल, असे संकेत आहेत. मागीलवेळी ठाकरे यांनी कल्याणमध्ये रेल्वे परीक्षार्थींवर हल्ला करुन आंदोलनाला सुरुवात केली. नंतर आंदोलनाचे लोण मुंबई शहरात पसरले. आताही ठाणे जिल्ह्यात मनसेच्या आंदोलनाची ठिणगी पडली तर नवल वाटायला नको.मुंबई शहरावरील वर्चस्वाकरिता सध्या भाजपा व शिवसेनेत संघर्ष सुरु आहे. वर्चस्वावरुन या दोन हत्तींमध्ये झुंज सुरु असताना राज यांनी आपल्याकरिता अनुकूल अशा ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या आठवड्यात राज यांनी ठाण्याचा दौरा करुन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मनसेने परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन रण पेटवले तर शिवसेनेलाही त्या मुद्द्यावर भूमिका घ्यावी लागते व त्याचा लाभ भाजपाला होतो. त्याचीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना