शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोकसभा क्षेत्रात दीड लाख मतदार दुबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 02:46 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाख ५६ हजार ७७९ मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदवली गेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाख ५६ हजार ७७९ मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदवली गेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामागे बोगस मतदानाची शक्यता असल्याने ही दुबार नोंदणी झालेली नावे तातडीने मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून मतदार याद्यांचा आढावा घेण्यास सुरवात झाली आहे. यादरम्यान अनेक मतदारांची दोन ते तीन ठिकाणी नोंदणी असल्याचे प्रकार समोर येवू लागले आहेत. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदार क्षेत्रात १ लाख ५६ हजार ७७९ मतदारांची दुबार नोंदणी असल्याची बाब शिवसेनेने उघडकीस आणली आहे. त्यामध्ये ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४१ हजार ७११, बेलापूर विधानसभा क्षेत्रात ३१ हजार ४५९, कोपरी पाचपखाडीत २१ हजार, मीरा भार्इंदरमध्ये १० हजार ५५८, ओवळा माजिवडामध्ये ३३ हजार ६१ आणि ठाणे विधानसभा क्षेत्रात १८ हजार ९७९ मतदारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी आहे.या माध्यमातून आगामी निवडणुकीत बोगस मतदानाची शक्यता असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. त्यानुसार दुबार नोंदणी असलेली ही नावे तत्काळ मतदार यादीतून वगळावीत या मागणीसाठी त्यांनी कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले. याप्रसंगी मुंबई झोपडपट्टी सुधार महामंडळाचे सभापती विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.सध्या सुरू असलेली मतदार नोंदणी प्रक्रि या काटेकोरपणे राबविण्यात यावी. एकच नाव अनेक मतदार याद्यांमध्ये अनेकदा नोंदविले जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.