शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Thane: उल्हासनगर महापालिका महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील वर्तन, आयुक्तांकडे तक्रार

By सदानंद नाईक | Updated: July 29, 2023 13:35 IST

Ulhasnagar Municipal Corporation: महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 'चलती क्या बाहेर' अश्या छळाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने आयुक्त अजीज शेख यांच्याकडे तक्रार केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 'चलती क्या बाहेर' अश्या छळाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने आयुक्त अजीज शेख यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी महापालिकेचे लक्तरे वेशीवर टांगायला नको म्हणून, अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

उल्हासनगरात कुछ भी हो शकता है, असे वक्तव्य एका माजी महापालिका आयुक्तांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केले होते. ते वाक्य महापालिकेला तंतोतंत लागू पडत आहे. महापालिका मालमत्ता विभागात लिपिक पदावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने  आयुक्त अजीज शेख यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अश्लील चाळ्याबाबत लेखी निवेदन दिल्याने, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. सन-२०१७ साली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आल्यानंतर, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलां कर्मचाऱ्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करून, 'चलती है क्या बाहेर' असे वारंवार बोलला आहे. मात्र भीती पोटी महिलेने त्यावेळी तक्रार केली नाही. त्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर महिलेचे सुटकेचा श्वास टाकला. मात्र पुन्हा अधिकाऱ्यांची गेल्यावर्षी महापालिकेत नियुक्ती झाल्यावर, महिला कर्मचाऱ्यांशी लगटपणा वाढला. 

अखेर... या छळाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने १० दिवसांपूर्वी आयुक्त अजीज शेख यांना याबाबत निवेदन देऊन, न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले. या निवेदनानंतर आयुक्त अजीज शेख यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघडणी करून कारवाईचे संकेत दिल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी लोकमत सोबत बोलतांना दिली. तसेच यापूर्वीही एक अशीच तक्रार आल्याचे आयुक्त म्हणाले.

दरम्यान महिला कर्मचाऱ्याने एका स्थानिक न्यूज चॅनेलवर याप्रकारचा उलघडा केल्यावर, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. महापालिकेच्या विशाखा महिला समितीकडे याबाबत तक्रार करून न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया या महिला कर्मचाऱ्याने दिली. तसेच सन-२०१७ साली सदर अधिकाऱ्याने महापालिकेचे काम सांगून एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेल्याचा गौप्यस्फोट महिला कर्मचाऱ्याने केला. महापालिकेत यापूर्वीही महिला कर्मचाऱ्यांसोबत असे प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव गुलदस्त्यात? महापालिका महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप करून खळबळ उडून दिली. मात्र त्या अधिकाऱ्यांचे नाव अद्यापही जाहीर केले नाही. मात्र आयुक्त अजीज शेख यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव नमूद असून आयुक्तांनी त्या अधिकाऱ्यांची कानउघडनी करून कारवाईचे संकेत दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळulhasnagarउल्हासनगर