शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Thane: वाहतुकीच्या नियमांची होळी, आठ हजार चालकांवर कारवाई, तीन दिवसांत वाहतूक पोलिसांची मोहीम

By जितेंद्र कालेकर | Updated: March 27, 2024 20:19 IST

Thane News: होळी, धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत वाहन चालविणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

- जितेंद्र कालेकर  ठाणे - होळी, धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत वाहन चालविणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविणारे, भन्नाट वेग, विना हेल्मेट, ट्रिपल सीट आणि रिक्षांमध्ये फ्रंट सीट प्रवासी नेणाऱ्या चालकांवर २२ ते २५ मार्च या चार दिवसांत कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने बुधवारी दिली.

सण, उत्सवाच्या काळात रस्त्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी लावून मोठा बंदोबस्त तैनात केला होता. होळी, धुलिवंदनाच्या काळात अनेक चालक मद्य प्राशन करून वाहन चालवितात. यातून अनेकवेळा अपघात होऊन चालक, तसेच प्रवाशांचा मृत्यू ओढवतो. काहीजण कायमचे जायबंदी होतात. त्यामुळे या दिवसात पोलिसांनी सतर्क राहून हुल्लडबाजी आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कारवाई केली.

पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांत वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी चौकात, तसेच नाक्यांवर कुमक तैनात केली होती. वाहतूक पोलिसांच्या १८ युनिटमार्फत ४० ब्रीथ ॲनलायझरद्वारे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. याशिवाय, २२ ते २५ मार्च २४ या चार दिवसांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. यामध्ये २५ मार्चला धुळवडीच्या दिवशी तब्बल तीन हजार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.  आयुक्तालयात अशी झाली कारवाई मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३८२ चालकांवर कारवाई झाली आहे, तर दुचाकीवर ट्रीपल सीट जाणाऱ्या एक हजार ८६ चालकांसह विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पाच हजार ११७ चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षामध्ये चालकांच्या बाजूच्या फ्रंट सीटवर प्रवासी नेणाऱ्या एक हजार ७३४ चालकांवर कारवाई केली आहे. सण, उत्सवासह सर्वच दिवसांमध्ये वाहतूक पोलिस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावतात. उत्साहाच्या भरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यासाठी नाकाबंदी केली होती. दंडाची कारवाई आणि अपघात टाळण्यासाठी चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.- डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस