शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

By जितेंद्र कालेकर | Updated: May 24, 2024 23:42 IST

Thane News: लोकलमधून प्रवास करणाऱ्या जगन लक्ष्मण जंगले (३१) या प्रवाशाच्या हातावर एका गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून, यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

- जितेंद्र कालेकर ठाणे - लोकलमधून प्रवास करणाऱ्या जगन लक्ष्मण जंगले (३१) या प्रवाशाच्या हातावर एका गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून, यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल याठिकाणी कामाला असलेल्या जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली. ठाणे स्थानक सोडल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला. यात तोल गेल्याने जगन हे फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाइलही गहाळ झाला. या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्यामुळे ते यात गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने, तसेच पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले. रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावीजगन यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सुदैवाने, या अपघातात त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना दोन्ही पाय गमवावे लागल्याची माहिती त्यांचे मेव्हणे प्रशांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून कठोर कारवाईची, तसेच रुग्णालयीन खर्च रेल्वे प्रशासनाने भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी ठाणे रेल्वे पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जगन हे नेमके कसे पडले, त्यांना कोणी पाडले, त्यांचा मोबाइल कोणी हिसकावला? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेAccidentअपघातthaneठाणे