शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचा पारा पुन्हा चढला; ४४.२ अंशावर गेला पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 19:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असतांनाच गुरुवारी ठाणो शहराचा पारा पुन्हा ४४.२ अशांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असतांनाच गुरुवारी ठाणो शहराचा पारा पुन्हा ४४.२ अशांवर गेला. त्यामुळे ठाणोकर चांगलेच हैराण झाले होते. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडले या आशेवर ठाणोकर होते. मात्र अवघ्या काही तासातच ठाण्याचा पारा चढल्याने ठाणेकरांना पावसासाठी काढलेल्या छत्रीचा वापर हा उन्हापासून बचाव करण्यासाठी केल्याचे दिसून आले.      हवामान विभागाने चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यातही सकाळचे वातावरण हे ढगाळ असल्याने पाऊस पडण्याची शक्यता बुधवारी आणि गुरुवारी देखील दिसून आली. मात्र ठाण्यात या दोनही दिवशी उन्हाचा पारा चढल्याचे दिसून आले आहे. त्यात गुरुवारी सकाळ पासूनच वातवरणात उष्णता जाणवत होती. तर, दुपारी हा पारा थेट ४४.२ अशांवर गेल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती. अनेकांच्या डोळ्यावर गॉगल, डोक्यावर टोपी दिसून आली. चाकरमान्यांनी आपला मोर्चा ताकाच्या गाड्यांवर तर, काहींनी नारळ पाणी, लिंबू सरबतीच्या गाडीवर वळविला असल्याचे दिसून आले.ठाण्यात सकाळच्या सत्रत म्हणजेच ९.३० वाजता ३३ अंश सेल्सीअस तापमान होते. त्यात ११.३० वाजता वाढ होऊन ३८.६ वर पारा गेला. त्यानंतर १२.३० वाजता त्यात आणखी वाढ होऊन तापमान ४१.९ अंशावर गेले. तर दुपारी अडीच वाजता हेच तापमान ४४.२ अंशावर गेल्याचे दिसून आले. मागील महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये तापमानाचा पारा हा ४४ च्या पार झाल्याचे दिसून आले होते. त्यात एप्रिल महिन्यात आता पुन्हा ठाण्यातील पारा चढल्याचे दिसून आले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात