शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 06:00 IST

७० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; १२ घरांचे नुकसान, मुंब्रा येथे एक जखमी

जितेंद्र कालेकर, अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोकण किनारपट्टीवर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ ठाणे जिल्ह्यात पोहोचले तोपर्यंत त्याची तीव्रता बरीच कमी झालेली असल्याने जीवितहानी टळली. वादळी वारे व झाडे, भिंत कोसळल्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. ठाणे शहरासह जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक मोठे वृक्ष उन्मळून पडले. मुंब्रा खडी मशीन रोड भागात एका बंगल्याची भिंत बुधवारी दुपारी बाजूच्या घरावर कोसळली. यात मंजूर जावळे (५५) जखमी झाले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही.दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निसर्ग वादळाचे नवी मुंबईतून ठाणे जिल्ह्यात आगमन झाले. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात वादळाचा प्रभाव जाणवला. वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक जुने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा वृक्ष पडले.तीन हजार नागरिकांचे स्थलांतरखबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला होता. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे पालिकेनेही एनडीआरफची टीम तैनात ठेवली.खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.वादळाची कमी झालेली तीव्रता यामुळे सुदैवाने मोठी हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.आपत्ती व्यवस्थापन पथक तैनातठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे पालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन पथके मीरा-भार्इंदर, शहापूर, नवी मुंबईत तैनात केली होती.सखल भागात पाणीकल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी साचले होते. ठाण्यातील कळवा भागातील नवशक्ती चाळीत पाणी साचले होते. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. शहापूरातील दरिहगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचे नुकसान झाले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ