शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध, एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्ट संकेत

By अजित मांडके | Updated: September 7, 2023 16:30 IST

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखविलेल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे.

- अजित मांडके ठाणे  -  सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखविलेल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. परंतु हे आरक्षण देत असतांना इतर समाजाच्या आरक्षाणाला कुठेही धक्का लावला जाणार नसल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे साहेबांच्या हंडीला शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस होते, त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयाने देखील अंतिम केले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टा ते रद्द झाले असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु आता ते राजकारण करीत असल्याचेही ते म्हणाले. उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे हे राज्याचा दौरा करीत असून निष्ठेची भाषा करीत असल्याबाब त्यांना छेडले असता, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा विकली, त्यातही बाळासाहेबांचे विचार विकणाºयांनी निष्ठाचे भाषा आम्हाला शिकवू नये असा इशाराही त्यांनी दिला. सनातन धर्माला आजही अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कितीही स्टॅलीन किंवा इतर कोणी आले तरी सनातन धर्माला धक्का लागू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दहीहांडीच्या निमित्ताने गोंविदा थर लावत आहेत, दुसरीकडे राज्यातही सरकार विकासाचे थर लावत असल्याचे त्यांनी सांगितले. आता अहंकाराचे थर कोसळले असून विकासाचे थर रचले जात असल्याचेही ते म्हणाले.  देशात राज्यात मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले तरी त्याचा काहीही परिणाम मोदींवर होणार नसून २०२४ ची लोकसभेची हंडी हे मोदीच फोडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

हंडीला वरून राजाही  प्रसन्न झाला आहे.  मुंबईत तसेच ठाण्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोचला असून , खरं म्हणजे ठाणे हे गोविंदाचे पांढरी असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मवीर आनंद  दिघें यांनी हा उत्सव  सुरु केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करू लागले , आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी  मुख्यमंत्री झालो, त्यामुळे आपण राज्यात चांगले काम करत आहोत, कोरोना काळात लावण्यात आलेली सर्व नियम, बंधने काढून टाकली , गणपती उत्सवावरील वरील सर्व बंधने काढून टाकली , यावर्षी आणखी जोरदार उत्सव साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली, थर लावताना प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे, सरकारने यावेळी प्रो गोविंदा घेऊन साहसी खेळात याचा समावेश आहे, गोविंदाची सुट्टी पण जाहीर केली, १० लाखांचा विमा देखील काढला, त्यामुळे सांघिक भावनेने उत्सव साजरा करून या उत्सवाला गालबोट लागला काम नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणthaneठाणे