शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

ठाणे शासकीय रुग्णालयाचे स्थलांतर अद्याप अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:48 IST

जीर्ण झालेल्या पाच इमारती पाडण्याबरोबरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने वेगवेगळे दोन जीआर काढल्यानंतर आता पुन्हा ठाणे जिल्हा (सामान्य) रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

- पंकज रोडेकरठाणे - जीर्ण झालेल्या पाच इमारती पाडण्याबरोबरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने वेगवेगळे दोन जीआर काढल्यानंतर आता पुन्हा ठाणे जिल्हा (सामान्य) रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती रुग्णालयाच्या तातडीने स्थलांतरासाठी शहरात अन्यत्र इमारत उपलब्ध करण्यासाठी पाहणी करून पर्यायी व्यवस्था तसेच सध्या ज्या ठिकाणी रुग्णालय सुरू आहे, त्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास करून रुग्णालयाचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी उपाययोजना सुचवण्याबाबत एक महिन्यात अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे रुग्णालयाचे स्थलांतर अधांतरी होऊन बसले आहे.९ मार्च २०१८ ला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील ए, बी, सी, डी आणि ई या पाच जुन्या झालेल्या इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर, १७ जुलै २०१८ रोजी सामान्य रुग्णालयात ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने दुसरा जीआर काढला. परंतु, पहिल्या जीआरमध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाच्या इमारतीत जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर करताना केंद्र शासनाकडून याबाबतची परवानगी प्राप्त झाल्यानंतर रुग्णालय स्थलांतर करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही नमूद केले आहे. मात्र, अद्यापही केंद्र सरकारकडून त्याबाबत परवानगी मिळालेली नाही. तसेच जरी परवानगी मिळाली, तरी त्या रुग्णालयातील अंतर्गत डागडुजीच्या कामासाठी काही महिने जातील, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यातच, रुग्णालय प्रशासनाकडून शहरातील काही पर्यायी जागांचे प्रस्ताव पुढे आले होते. त्यातील साकेत आणि कशीश पार्क येथील महापालिकेच्या इमारती रुग्णालय स्थलांतरासाठी पुरेशा आणि सुसज्ज होत्या. त्यातील कशीश पार्क मधील महापालिकेची इमारत जवळपास निश्चित झाली होती. ही जागा पाहण्यासाठी मुख्य सचिव येणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक काही तासांवर आल्यानंतर रद्द झाला. त्यामुळे स्थलांतराचा मुद्दा बारगळला. त्यातच, पुन्हा मंगळवारी रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती महिनाभरानंतर देणार असलेल्या त्या अहवालावर स्थलांतर करण्याबाबतचा अंतिम निर्णय शासनदरबारी मान्यतेने घेण्यात येईल, असे म्हटले आहे.समितीमध्ये सहा सदस्यांचा समावेशमुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीत सहा सदस्य असणार आहेत. त्यामध्ये प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य), ठामपा आयुक्त, मुंबई आरोग्य सेवा संचालनालय आयुक्त तथा अभियान संचालक, मुंबई आरोग्य सेवा संचालनालय संचालक, ठाणे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे संबंधित सहसचिव या सहा सदस्यांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणे