शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना सुखद श्रावणसरींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:26 IST

जिल्ह्यात पावसाची सरासरी ९१.८३ : भिवंडीत १०५ टक्के पाऊस

ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंगठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जिल्ह्यात श्रावणसरी कोसळल्या. काही काळ पाऊस पडल्यानंतर पुन्हा ऊन पडत असल्याचा अनुभव ठाणेकरांना मिळत आहे. यादरम्यान कल्याणच्या म्हारळगावात एक घर पडले, तर ठाणे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८७ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सरासरी ४१ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९१.८३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये साधारणपणे १५ हजार ७४९.३२ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून सरासरी दोन हजार २४९.९० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १०४.७७ टक्के पडला असून याखालोखाल ठाणे शहर परिसरात ९७.४९ टक्के, तर कल्याणला ९२.३५, उल्हासनगरला ९५.७२, मुरबाडला ८०.४३, अंबरनाथला ८८.७० आणि ८३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे.ठाणे : रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहरात दिवसभर जोरदार बॅटिंग केल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर, वाढत्या पावसामुळे शहराच्या विविध भागांत त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

ठाणे शहरात मागील आठ तासांत ४३.६९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानुसार, शहरात आतापर्यंत २२४४.८५ मिमी पाऊस शहरात झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २६७४.६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळी पावसाने अधूनमधून जोरदार बॅटिंग केल्याचे दिसून आले. तर, दुपारी काही वेळ पावसाने उसंत घेतली. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाने आपला रंग दाखवला. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. शहरातील विविध भागांत कोसळणाºया पावसामुळे आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. तर, शहरात दिवसभरात सात ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. तर, दोन ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्या होत्या. तर, पाच ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत आले होते. तर, एक ठिकाणी संरक्षक भिंत आणि अन्य एका ठिकाणी नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. तर शहरातील नेहमीच्याच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मागील आठवड्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शहर जलमय झाले होते.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी