शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मुलीने विषप्राशन तर आईने केली उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:02 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एकुलती एका मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर,तिच्या विरहातूनआईने राहत्या घरातून १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे.

ठळक मुद्दे ‘सीए’चे शिक्षण घेणा-या मुलीच्या आत्महत्या इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील जिन्याच्या खिडकीतून घेतली आईने उडी मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही

ठाणे: ‘सीए’चे शिक्षण घेणा-या मुलीच्या आत्महत्येचे दु:ख सहन न झाल्याने, तिच्या आईनेही चोवीस तासात आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ठाण्यात घडली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आले नसून, सलग दोन दिवस माय-लेकींनी जिवनयात्रा संपविल्याने ठाण्यातील या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.पोखरण रोड येथील सिद्धांचल सोसायटीमध्ये १७ व्या मजल्यावर कोदमनचिली कुटूंब वास्तव्यास आहे. त्यांची १९ वर्षांची एकुलती एक मुलगी नौवया सीए शिकत होती. परिक्षा सुरु असताना, तिने शनिवारी अचानक उंदीर मारण्याच्या औषधासह काही अन्य गोळ्यांचे सेवन केले. त्यामुळे त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी तिला ठाण्यातील एका नामंकीत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराला तिने दाद दिली नाही. या घटनेने मुलीचे कुटुंब शोकसागरात बुडाले. तिची आई शुगुनाच्या दु:खाला तर पारावर राहिला नाही. जिवापाड जपलेल्या मुलीचा मृतदेह घरी नेल्यानंतर, त्या एकटक तिच्याकडे पाहत होत्या. रविवारी सकाळी सहा ते सव्वा सहा वाजताच्या सुमारास शुगुना घराबाहेर आल्या. दु:खाच्या भरात त्यांनी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील जिन्याच्या खिडकीतून उडी घेतली.त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.मुलीच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केली असावी,अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. चितळसर पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांची वेगवेगळी नोंद करण्यात आली आहे. नौवया ही अभ्यासात हुशार होती. तिच्या हाती नेहमीच पुस्तक असायचे.तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी रुपाली पाटील करीत आहेत............................... 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे