शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Thane: सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील बेकायदेशीर पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

By अजित मांडके | Updated: June 28, 2024 18:24 IST

Thane News: ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार हि कारवाई शहरातील विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रात सुरू आहे.

- अजित मांडके  ठाणे - ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार हि कारवाई शहरातील विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रात सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण ४० पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून ९ ठिकाणी कारवाई करण्यात आली.

नौपाडा, उथळसर, मानपाडा प्रभागसमिती या परिसरात  दिव्यांगाना देण्यात आलेले स्टॉल व अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल यांची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणची ८ दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई ही स्थावर विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या गोपालआश्रम व एंजल बार ॲण्ड रेस्टॉरंट या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडा परिसरातील शाळेपासून शंभर मीटरच्या आत असलेल्या पान टपरीवर  तसेचअंजली बार रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभागसमिती कार्यक्षेत्रात शाळापरिसरात १०० मीटरच्या आत असलेल्या पानटपरी, अनधिकृत टपऱ्या, बार तसेच  श्रीनगर येथील हवेली धमाल बार वर कारवाई करण्यात आली.

वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या बॉम्बे डक, सूर संगीत बार ही अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्यात आली. कळवा प्रभाग समिती अंतर्गत शाळेजवळ असलेल्या अनधिकृत पानटपरी तसेच दुकानांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत शाळा परिसरात असलेल्या अनधिकृत पान टपरी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांनी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका