शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात फायनान्स कंपनीच्या वाहनांचा अपहार करुन परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:04 IST

ठाण्याच्या ‘साई पॉईन्ट’ या वाहनांसाठी कर्ज पुरवठा करणा-या कंपनीच्या थकबाकीदारांच्या दुचाकी परस्पर एका गोदामात ठेवून नंतर त्यांची विक्री करणा-या कंपनीचाच वसूली अधिकारी दीपक रावत आणि त्याचा साथीदार अजगर खान या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देथकबाकीदारांची वाहने जप्त करुन केली विक्रीवसूली अधिकाऱ्याचा ‘प्रताप’नौपाडा पोलिसांची कामगिरी

ठाणे: वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणा-या ठाण्यातील एका वित्तीय संस्थेच्या थकबाकीदारांच्या वाहनांची परस्पर विक्री करणा-या दीपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांना नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली आहे.ठाण्याच्या पाचपाखाडीतील ‘साई पॉईन्ट’ या वाहनांना कर्ज पुरवठा करणा-या कंपनीतून बरीच वाहने बेपत्ता असल्याची तक्रार या कंपनीने नौपाडा पोलिसांकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती. याच कंपनीचा मुख्य वसूली अधिकारी म्हणून काम करणारा दिपकसिंग रावत यानेच अजगर खान या दलालाच्या मदतीने कर्ज थकबाकीदारांची वाहने परस्पर आणून ती कंपनीत न ठेवता आपल्याच गोदामात ठेवली. नंतर त्यांची त्याने विक्रीही केली. अशाच विक्री केलेल्या वाहनांपैकी एकाच्या मालकाने मोटारसायकलची आरटीओ कार्यालयात नोंदणीसाठी लागणारा ना हरकत दाखला (एनओसी) साई पॉर्इंट कंपनीकडे मागणी केला. परंतू, त्या दुचाकीच्या विक्रीची नोंदच या कंपनीत नव्हती. शिवाय, ती या कंपनीत उपलब्धही नव्हती. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापक जयप्रकाश तिवारी यांनी इतरही वाहनांची चौकशी केली. तेंव्हा अनेक वाहने बेपत्ता असल्याचे आढळले. तेंव्हा याप्रकरणी चौकशीचा अर्ज दोन महिन्यांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात या कंपनीने केला. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या अर्जाची चौकशी केल्यानंतर हे रॅकेट उघड झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस हवालदार अहिरे आदींच्या पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तेंव्हा साई पॉर्इंटचा कर्मचारी रावत यानेच एका दलाला हाताशी धरुन अनेक वाहनांचा अपहार करुन त्यांची ५० हजार ते सव्वा लाखांच्या किंमतीमध्ये विक्री केल्याचे आढळले. हा प्रकार तिवारी आणि कंपनीच्या मालकाच्या परस्पर झाल्याने त्यांनाही या प्रकाराची माहिती नव्हती. ज्या दुचाकीच्या मालकांनी कर्ज थकीत केले आहे, त्यांची वाहने ताब्यात घेऊन ती कंपनीच्या काल्हेर, भिवंडीतील गोदामात जमा करण्याचे काम रावतकडे होते. ही वाहने जमा केल्यानंतर त्याची मेलद्वारे माहिती देण्याचे कामही त्याच्याकडे होते. याचाच फायदा घेऊन रावत याने अजगर या दलालाच्या मदतीने हप्ते न भरलेल्या मोटारसायकली उचलून त्याची कंपनीला कोणतीही माहिती न देता त्यांची परस्पर विक्री केली. विक्री केलेल्या वाहनांची रक्कम कंपनीच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे आवश्यक असतांनाही तिचा त्यांनी अपहार केला. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी ६ जुलै रोजी कंपनीने नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच ७ जुलै रोजी दिपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांनी चोरी करुन परस्पर विक्री केलेल्या सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनाही सुरुवातीला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी