शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

ठाणे जि.प.चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर; त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांसह काम सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 20:06 IST

इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय असताना थेट कामांची यादी मंजूर झाल्याचा उल्लेख कसा, असा सवाल पाटील यांनी करून दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असताना त्याच्या दुरूस्तीसाठी ७० लाखांचा निधी निदर्शनात आणून देताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यास सावरण्याचा प्रयत्न या सर्वसाधारण सभेच्या व ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी करून त्वरीत चौकशीचे आदेश जारी केले. येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये आज हीसर्वसाधारण सभा झाली.

ठळक मुद्देपावणेतीन कोटींचे काम सुरू असतानाच या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ७० लाखांच्या निधीच्या मंजुरीचा प्रस्तावशहापूर तालुक्यातील दोन म्हशान भूमीचे कामे न करताच निधी हडप केला, तीन अंगणवाड्या न बांधताच बिल काढण्यात आलीमुरबाडमध्येही काम झालेल्या रस्त्याचे काम पुन्हा घेण्यात आल्याचे सदस्य सुभाष घरत यांनीही निदर्शनात आणून दिले

ठाणे : शहापूर तालुक्यातील दोन म्हशान भूमीचे कामे न करताच निधी हडप केला, तीन अंगणवाड्या न बांधताच बिल काढण्यात आली आदीं भ्रष्टाचारासह रस्त्यांची कामे झालेली असतानाही त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेण्याची मनमानी आणि भिवंडी तालुक्यातील केवणी दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असतानाच या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ७० लाखांच्या निधीच्या मंजुरीचा प्रस्ताव सोमवारी ठाणेजिल्हा परिषदेच्या (जि.प.) सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य देवेश पाटील यांनी उघड करून भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून जि.पचे पितळ उघडे पाडले.इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय असताना थेट कामांची यादी मंजूर झाल्याचा उल्लेख कसा, असा सवाल पाटील यांनी करून दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असताना त्याच्या दुरूस्तीसाठी ७० लाखांचा निधी निदर्शनात आणून देताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यास सावरण्याचा प्रयत्न या सर्वसाधारण सभेच्या व ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी करून त्वरीत चौकशीचे आदेश जारी केले. येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये आज हीसर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती, मुख्यकार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदींसह जिल्हा प्रकल्प अधिकारी रूपाली सातपुते आदींची व्यासपीठावर उपस्थित होते. इतिवृत्त मंजुरीच्या विषयावर बोलताना देवेश पाटील म्हणाले की गेल्या वेळी सभेत बांधकाम विभागाची कामे मंजूर करण्याचा विषय होता. मात्र, आता थेट कामांची यादी मंजूर कशी झाली, असा सवाल त्यांनी केला. पण सदस्यांच्या लेखी सुचनेवरून कामे घेतल्याचा खुलासा बांधकाम कार्यकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. केवणीदिवे - पुर्णा रस्त्याचे दोन कोटी ७५ लाख रु पयांचे काम सुरू असताना या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेने चक्क ७५ लाख रु पयांची दुरूस्ती करणार असल्याचे जाहीर केल्याचे देवेश पाटील यांनी यावेळी उघकीस करून सभागृहात खळबळ उडवली. एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा रस्ते तयार करण्यामागे भ्रष्टाचार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या कामांना स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली. गेल्या वर्षाचीच रस्तयांची कामेची कामे अद्यापी सुरू असतानाच, नव्याने कामे देण्याची घाई का, यावर अधिकाऱ्यांसह सीईओ, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे आदींनी सारवासारव करण्याचा प्रयत्न यावेळी केला. मात्र, काही रस्त्यांच्या कामांना अद्यापी कार्यादेश दिला नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी मान्य केले.भिवंडी तालुक्यातील सदस्यांकडून मागणी नसतानाही रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. कल्याण ग्रामीण, शहापूर वा मुरबाड तालुक्यातील रस्त्यांसाठी हा निधी वापरता आला असता, याकडे देवेश पाटील यांनी लक्ष वेधले. तर मुरबाडमध्येही काम झालेल्या रस्त्याचे काम पुन्हा घेण्यात आल्याचे सदस्य सुभाष घरत यांनीही निदर्शनात आणून दिले. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या शहापूर तालुक्यात दोन म्हशान भूमीच्या कामांच्या निधींसह तीन अंगणवाडी केंद्रांचे बांधकामे झालेले नसतानाही संबंधीत ग्रासेवकाने कामांचे बील काढून घेतल्याचे सदस्यांने या वेळी सभागृहत उडघ केले. एकाच रस्त्याची दोन वेळा कामे करण्याच्या प्रकरणांची चौकशीचे आदेश अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याकडून चौकशी केली जाईल. तसेच तयार केलेल्या प्रस्तावांचा नव्याने आढावा घेतला जाईल, असे सीईओ यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद