शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर ; ४४ शाळा कायमच्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 18:51 IST

ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देशाळा बंदचे संकट तुर्तास टळले असले तरी स्थलांतर म्हणजेच संबंधीत गावातील शाळा गावक-यांसाठी बंद होणारराजकीय पक्षांच्या प्रचाराकाना या शाळांच्या मुद्यावर गावक-यांकडून जाब विचारला जाणार

ठाणे : जिल्ह्यात वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या ३११ प्राथमिक शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) आहेत. यातील केवळ ४४ शाळा कायमच्या बंद होणार आहेत. तर उर्वरित २६७ शाळांचे जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र शाळा बंद व काहींचे स्थलांतर करण्याच्या मुद्यावरून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जि.प. व पंचायत समित्यांच्या (पं.स.) निवडणूक प्रचारा दरम्यान गावकऱ्यांकडून जाब विचारला जाणार आहे.जि.प. व पं. स.च्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचार रंगात येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून सुरू झाल्या. या विषयी ‘ जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी वाऱ्यांवर’ या मथळ्याखाली लोकमतने १९ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिध्द  करून  हा विषय उघडकीस केला आहे. त्याची वेळीच दखल घेत शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांचे सर्वेक्षण केले. त्यात ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.जिल्ह्यातील शहापूरच्या १०९ शाळांसह भिवंडीच्या ५१ शाळा, कल्याणच्या १६, मुरबाडच्या १२० आणि अंबरनाथच्या १७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहेत. यातील दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या ४४ शाळांचा शोध घेऊन त्या बंद होणार आहे. तर २६७ शाळांचे अन्यत्र स्थलांतरण होणार आहे. या शाळा बंदचे संकट तुर्तास टळले असले तरी स्थलांतर म्हणजेच संबंधीत गावातील शाळा गावक-यांसाठी बंद होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचाराकाना या शाळांच्या मुद्यावर गावक-यांकडून जाब विचारला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली गावकरी एकत्र येऊन उमेदवारांना वेठीस धरणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार