शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याला जलमार्गाची प्रतीक्षा!, नव्या वर्षात तीन हजार २५३ कोटींचे प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:26 IST

मुंबई महानगरानंतर आता ठाणे जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत आहे. स्मार्ट सिटीचे वेध लागल्यामुळे दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा ताण महामार्गांसह लोहमार्गांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यातून होणा-या वाहतूककोंडीला जलमार्गाचा पर्याय उत्तम असल्याचे जाणकारांचे मत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे  - मुंबई महानगरानंतर आता ठाणे जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत आहे. स्मार्ट सिटीचे वेध लागल्यामुळे दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा ताण महामार्गांसह लोहमार्गांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यातून होणा-या वाहतूककोंडीला जलमार्गाचा पर्याय उत्तम असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे नवीन वर्षात सुमारे तीन हजार २५३ कोटींचे जिल्ह्यातील सहा जलमार्ग पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नाताळ सुटीच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश महामार्गांवर नागरिकांना वाहतूककोंडीशी लढावे लागले. त्यात घरी जाणाºया चाकरमान्यांनादेखील वेळेत घर गाठणे कठीण झाले. यातून मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसह नवी मुंबई महापालिका-एमएमआरडीएचे दोन जलमार्ग मार्गी लावण्याचा प्रशासनाचा संकल्प लोकहिताचा ठरणार आहे.केंद्र शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या फिफटीफिफटीच्या खर्चातून जलमार्गांना मुहूर्तरूप प्राप्त होईल. लोकप्रतिनिधींद्वारे त्यावर तात्पुरती चर्चा होते, प्रसिद्धी मिळते; पण संबंधित प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्यास जलमार्ग मार्गी लागणे शक्य आहे. त्यासाठीचा आवश्यक त्या तयारीचा आढावा केंद्र शासन पुरस्कृत दिशा समितीच्या बैठकीत होणे अपेक्षित आहे. यामुळे केंद्राचा ५० टक्के निधी या बैठकीद्वारे सहज मिळणे शक्य आहे.नवी मुंबई परिसरातील खाडीत सुरू होणारी जलवाहतूक जिल्ह्यात सर्वाधिक खर्चाची आहे. यामध्ये वाशी ते ठाणे आणि पामबीच मार्गाला समांतर वाशी ते बेलापूर जलमार्गाचा समावेश आहे. यातील पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानचा १२ किमी लांबीच्या जलमार्गास एमएमआरडीएनेदेखील सहमती दर्शवली आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.वाशीगाव येथून खाडीकिनाºयावरून कोपरखैरणे- घणसोली-गोठिवली-रबाळे-ऐरोली व दिघा हा जलमार्ग उपनगरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानच्या जलमार्गास अनुकूलताही दर्शवली आहे. यानंतर, वाशी ते बेलापूरदरम्यानचा मार्गही त्वरित हाती घेण्याची गरज आमदार संदीप नाईक यांनी दिशाच्या बैठकीत व्यक्त केली आहे.ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी ठाणे महापालिकेला खर्च करणे अपेक्षित आहे. उर्वरित सुमारे १६६ कोटींचा खर्च केंद्र शासनाकडून मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे ते वसई, मीरा-भार्इंदर जलमार्ग, ठाणे ते भिवंडी, ठाणे ते डोंबिवली, कल्याण आदी चार जलमार्ग ठाणे मनपाने गांभीर्याने पूर्ण करण्याची अपेक्षा ठाणेकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.जिल्ह्यास मुंबई-अहमदाबाद, आग्रा, बंगळुरू व गोवा आदी चार राष्टÑीय राजमहामार्गांनी वेढले आहे. त्यावरील अत्यल्प कमी किलोमीटरच्या अंतरावरील १५ टोलनाके अधूनमधून डोके वर काढतातच. यामुळे सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेसह वाहतूककोंडीच्या चक्र व्यूहात अडकलेल्यांना जलमार्गाचा पर्याय सर्वोत्तम आहे. यातून ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणावरही मात करून पर्यावरण संतुलन राखता येणार असल्याचे बोलले जाते.चार जलमार्गांसाठी ४५३ कोटी अपेक्षितठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी ठाणे महापालिकेला खर्च करणे अपेक्षित आहे. उर्वरित सुमारे १६६ कोटींचा खर्च केंद्र शासनाकडून मिळण्याची अपेक्षा आहे. यानुसार, प्रशासनाने तयारी दाखवली, मात्र प्रत्यक्षात कागदावरील जलमार्गाचे काम खाडीपात्रात दिसणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये इंद्रासिटी रूट ते घोडबंदर रोड, कोलशेत, साकेत, दिवा हा जलमार्ग आहे.

टॅग्स :thaneठाणे