शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा पुरवठा कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू, दिवाळीतील लाडू होणार कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 19:13 IST

जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर केल्या नाही. सतत पाठपुरावा करून संतापलेल्या या कर्मचार्यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

ठाणे - जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-याच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर केल्या नाही. सतत पाठपुरावा करून संतापलेल्या या कर्मचार्यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या आंदोलनामुळे  ठाणे जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर सणासुदीच्या अन्नधान्यांसह साखर, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार नाही. यामुळे दिवाळीचा लाडू मात्र कडू होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.    या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील सुमारे २००कर्मचा-यांचा  समावेश असल्याचे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रशांत  कापडे यांनी लोकमतला सांगितले. या कामबंद आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास दिवाळी सणानिमित्त जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील सुमारे 593 शिधावाटप दुकानांवर सणासुदीचे अन्नधान्य, गोडे तेल, साखर, डाळी आदींचा पुरवठा अजिबात होणार नाही. परिणामी सुमारे लाखो ग्रामस्थ, आदिवासी कुटुंबिये दिवाळीत लाडू सारख्या गोडधोड  पदार्थापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.      जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीच्या कर्मचार्यांनी या आदोलनात सहभाग घेतला. बेमुदत कामबंद आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मात्र ते कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही. त्यांच्या या असहकारमुळे ग्रामीण कुटुंबियाना जीवनावश्यक  वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक कर्मचार्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागासह तहसीलदारांच्या नियंत्रणातील पुरवठा कर्मचारी या आंदोलनात आहेत.     या आंदोलनापाठोपाठ १० ऑक्टोबरपासून महसूल कर्मचारी देखील बेमुदत आंदोलन छेडणार आहे. ऐन दिवाळीत राज्यभर होणाऱ्या या आंदोलनादरम्यान अन्नधान्याच्या पुरवठा व शासकीय कामांना खीळ बसणार आहे. आश्वासन देऊनही कर्मचा-यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून संतापलेल्या कर्मचा-यांनी या बेमुदत व असहकार आंदोलनाचा पवित्र घेतल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे