शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एबीएलच्या साडे सहा कोटींच्या भ्रष्टाचार चौकशी समितीत आता ठाणे जि.प. सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 19:15 IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अ‍ॅक्टीव्हीटी बेस लर्निंग (एबीएल) या नाविण्यपूर्ण योजनेचे शिक्षण लागू केले आहेत. राज्य शासनाचा ‘प्रगत महाराष्ट्र ’ हा राज्यस्तरीय उपक्रम लागू असतानाही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या हट्टासाखाली जिल्हा परिषदेने पुन्हा एबीएलचे शिक्षण लागू केले. पण ते केवळ कार्डचे खरेदी करण्याच्या पुढे गेलेच नाही. तरी देखील पाच कोटी ८८ लाख रूपयांचा खर्च झाला.

ठळक मुद्देराज्य शासनाचा ‘प्रगत महाराष्ट्र ’ हा राज्यस्तरीय उपक्रम लागूतत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या हट्टासाखाली जिल्हा परिषदेने पुन्हा एबीएलचे शिक्षण प्राथमिक शिक्षण विभागाने सुमारे साडे सहा कोटी रूपये खर्चुन विद्यार्थ्यांसाठी केवळ कार्ड खरेदी

ठाणे : अ‍ॅक्टीव्हीटी बेस लर्निंग (एबीएल) या योजनेच्या नावाखाली ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि. प. ) प्राथमिक शिक्षण विभागाने सुमारे साडे सहा कोटी रूपये खर्चुन विद्यार्थ्यांसाठी केवळ कार्ड खरेदी केले. सततच्या मागणीनुसार भ्रष्टाचार चौकशी समिती गठीत केली मात्र त्यात केवळ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला होता. प्रशासनाची ही या मनमानी लोकमतने चव्हाट्यावर आणली होती. त्यास विचारात घेऊन अखेर शिक्षण समिती सदस्यांचा या चैकशी समितीत समावेश करण्यात आला आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अ‍ॅक्टीव्हीटी बेस लर्निंग (एबीएल) या नाविण्यपूर्ण योजनेचे शिक्षण लागू केले आहेत. राज्य शासनाचा ‘प्रगत महाराष्ट्र ’ हा राज्यस्तरीय उपक्रम लागू असतानाही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या हट्टासाखाली जिल्हा परिषदेने पुन्हा एबीएलचे शिक्षण लागू केले. पण ते केवळ कार्डचे खरेदी करण्याच्या पुढे गेलेच नाही. तरी देखील पाच कोटी ८८ लाख रूपयांचा खर्च झाला. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून हा मनमानी खर्च करणाऱ्यां शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांच्या गुणवत्तेचा कधी विचारच केला नाही. या दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या पण एबीएल राबवल्याचा चांगला, वाईट शेरा त्यांनी कोणत्याही शाळेत मारला नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांनी सांगितले.प्रशासनकांच्या कालावधीत शिक्षणाधिकाऱ्यांनी मनमानी करून हा सेस फंडाची रक्कम नाहक खर्च केली. त्यात साडे सहा कोटींचा भ्रष्टाचार झालेला असल्याचे घरत यांनी जिल्ह परिषदेच्या स्थायी समितीतही उघड केले. त्यांनी सातत्याने या विरोधात आवाज उठवला. त्यानंतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत झाली. पण आता सदस्यांनाही त्यात समाविष्ठ करून यातील भ्रष्टाचार उघड करून शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सुतोवाच घरत यांनी केल. या घोटाळ्याची चौकशी टाळण्याचा प्रयत्न ही प्रयत्नही प्रशासनाने केला होता. पण आता जल्हा परिषदेवरील तत्काली प्रशासक राजची मनमानी या एबीएल घोटळ्याच्या माध्यमातून उघडकीस आणणार असल्याचे घरत यांनी लोकमतला सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेzp schoolजिल्हा परिषद शाळा