शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा ‘क्वारंटाइन’ आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 06:52 IST

अंबरनाथचे ८४ फ्लॅट कोरोनाबाधितांसाठी घेतले जाणार होते ताब्यात; नव्याने निर्णय घेण्याचा हायकोर्टाचा आदेश

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंबरनाथ येथील ‘प्रसादम गृहसंकुला’च्या फेज १ मधील बांधून तयार असलेल्या ए १ व ए २ या दोन इमारतींमधील ८४ फ्लॅट नगर परिषदेस कोरोनाबाधित रुग्णांसाठी ‘क्वारंटाइन/आयसोलेशन सेंटर’ म्हणून वापरण्यासाठी अधिग्रहित करण्याचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ जून रोजी काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला असून जिल्हाधिकाºयांनी आधी निदर्शनास आणून न दिलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन दोन आठवड्यांत नव्याने निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे.

या इमारतींमधील फ्लॅट खरेदी केलेले रिद्धी अगरवाल यांच्यासह काही फ्लॅटधारक, हे गृहसंकुल विकसित करणारे आश्रय डेव्हलपर्स लि. हे विकासक आणि या जमिनीचे दर्शना दामले यांच्यासह इतर मूळ जमीनमालक यांनी केलेल्या याचिकांवर न्या. नितीन जामदार व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठानेहा आदेश दिला. हा अधिग्रहण आदेश काढल्यानंतर नगर परिषदेने त्या अनुषंगाने काही पुढील पावले उचलली असल्याने जिल्हाधिकाºयांनी नव्याने निर्णय घेईपर्यंत या फ्लॅट््सच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

या सुनावणीत फ्लॅटधारकांसाठी अ‍ॅड. नौशाद इंजिनीअर, मूळ जमीन मालकांसाठी अ‍ॅड. सैयद साहिल नागामिया, विकासकासाठी अ‍ॅड. निलेश गाला, नगर परिषदेसाठी अ‍ॅड. ए. एस. राव तर राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील पी. जी. सावंत यांनी काम पाहिले.पालिकेने वस्तुस्थिती दडवलीन्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत असे स्पष्ट झाले की, अंबरनाथ नगर परिषदेने हे फ्लॅट ताब्यात घेण्यासंबंधी मे. आश्रय डेव्हलपर्स यांना १३ जून रोजी पत्र पाठविले. हे फ्लॅट लोकांना आधीच विकलेले आहेत व त्यांना त्यांची ‘पझेशन लेटर्स’ही दिली गेली आहेत. त्यामुळे फ्लॅट क्वारंटाइन सेंटरसाठी देणे शक्य होणार नाही, असे विकासकाने १७ जूनच्या पत्राने नगर परिषदेस कळविले.असे असूनही नगर परिषदेने हे फ्लॅट््स अधिग्रहित करण्याची विनंती करणारे जे पत्र २३ जून रोजी जिल्हाधिकाºयांना लिहिले त्यात हे फ्लॅट विकले गेले आहेत, त्यांची ‘पझेशन लेटर्स’ खरेदीदारांना आधीच दिली गेली आहेत व त्यामुळे विकासकाने फ्लॅट ताब्यात देण्यास असमर्थता कळविली आहे, या गोष्टींचा उल्लेखही केला नाही.त्यामुळे हे फ्लॅट अधिग्रहणासाठी उपलब्ध आहेत, असा चुकीचा समज झाल्याने जिल्हाधिकाºयांनी २५ जूनचा आदेश काढला. परंतु आता ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आणि अशा प्रकारे लोकांनी राहण्यासाठी रीतसर विकत घेतलेले फ्लॅट कायद्यानुसार अधिग्रहित केले जाऊ शकतात का, याचा कायदेशीर विचार करून नव्याने निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस