शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची निवडणूक जाहीर; ३० मार्चला मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 20:49 IST

TDCC Election : सहकार क्षेत्रात राज्यातील बँकांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत बँक म्हणून या टीडीसीसी बँकेची ओळख आहे.

ठाणे - ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे.  या बँकेच्या २१ संचालकांसाठी ३० मार्च रोजी मतदान होणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर होत असून  १४ जानेवारी पासून या राज्यातील सर्वात श्रीमंत बँकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे.  सहकार क्षेत्रात राज्यातील बँकांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत बँक म्हणून या टीडीसीसी बँकेची ओळख आहे. २१ संचालकांच्या या बँकेच्या निवडणुकीसाठी उच्च न्यायालयाने ११ जानेवारीला हिरवा कंदील दिल्यानंतर  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ही निवडणूक घोषित केली आहे. यामध्ये ३० मार्चला मतदान होणार असून तर ३१ मार्चला मतमोजणी होणार आहे. वसईच्या बहुजन विकास आघाडीचे संस्थापक आमदार हितेंद्र ठाकूर यांचे खंद्दे समर्थक राजेंद्र पाटील, हे या बँकेचे विद्यमान अध्यक्ष असून भाजपा पुरस्कृत भाऊ कुर्हाडे उपाध्यक्ष आहे. सध्याच्या या विद्यमान १८ संचालकांवर या बँकेचा कारभार सुरू होता. या संचालक मंडळापैकी उर्वरित अशोक पोहेकर, कृष्णा घोडा आणि अँड. देविदास पाटील या तिन्ही संचालकांचे निधन झालेले आहे. कोरोनामुळे या बँकेची निवडणूक रखडली होती. राज्यातील अन्य जिल्हा बँकांच्या निवडणुकांना राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत  मुदतवाढ दिली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार या टीडीसीसी बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली आहे.  हे निवडणूक प्रक्रिया १४ जानेवारी पासून सुरु होणार आहे. मतदार निश्चित करण्यासाठी संस्थांचे ठराव १४ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत द्यावे लागणार आहे. त्यानंतर हे ठराव २२ जानेवारीपर्यंत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर करावे लागणार आहे. त्यानंतर बँकेची प्रारूप मतदार यादी २५ जानेवारी पर्यंत पूर्ण होईल. २७ जानेवारीला ती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत राहील. १६ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन पत्रे २६ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत सादर करता येणार आहे. ५ मार्च रोजी अर्जाची छानणी होणार असून ८ मार्च रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. २२ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २३ मार्च रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.

टॅग्स :Electionनिवडणूकthaneठाणे