शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यालादेखील कुपोषणाचा विळखा

By admin | Updated: November 14, 2016 04:19 IST

नागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ

सुरेश लोखंडे / ठाणेनागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बागडत असून त्यात ८ हजार १९२ बालके शाळाबाह्य आहेत. ११ हजार मुले कुपोषण पीडित असून ८९३ बालके तीव्र कुपोषणामुळे जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे उघड झाले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात मुलांचे चाचा नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बालदिन’ साजरा होत असताना जिल्ह्यातील बालकांची ही अवस्था समोर आली आहे.जिल्ह्यात ५२ कनिष्ठ महाविद्यालयांसह प्राथमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक असलेल्या एकूण १३०७ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांत सोयीसुविधा उत्तम आहेत. मराठी माध्यमाच्या दोन हजार ५२४ शाळांपैकी उच्च माध्यमिक १४ शाळा, प्राथमिक एक हजार १९६, माध्यमिक २८६, प्राथमिकसह माध्यमिक ८३० शाळा जिल्ह्यात आहेत. यातील अनेक शाळांतील मुले सोयीसुविधेपासून वंचितच राहिले आहेत. पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम सकस व पोषण आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रुपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅमच्या आहारासाठी पाच रुपये ७८ पैसेयाप्रमाणे प्रत्येक दिवसाकरिता शासन अनुदान दिले जात आहे. दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जातो. तरीही, बालके कुपोषणाने पीडित असल्याचे वास्तव नजरेआड करता येत नाही.

11,000बालकांना कुपोषणाची पिडा-ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागात एक लाख १८ हजार ६५६ बालके आहेत. यातील सहा वर्षेवयोगटाचे एक लाख पाच हजार ८५४ बालके सर्वसाधारण श्रेणीचे आहेत. तर, ११ हजार बालके कुपोषणाने पीडित आहेत. यामध्ये ८९३ बालके तीव्र कुपोषणाने जर्जर झाले आहेत. त्यांना सशक्त करण्यासाठी ‘व्हीसीडीसी’ केंद्राद्वारे सतत पोषण आहार देणे गरजेचे आहे.

वर्षभरात ८१९३ शाळाबाह्य बालकांचा शोध -‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. या वर्षभरात आठ हजार १९३ शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यापैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगितले जात आहे. तर, जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत घेतल्याचा दावा केला आहे; पण चौकशीअंती बहुतांश ठिकाणी या मुलांची नोंद आढळून येत नाही. सहा महापालिकांमध्ये सहा हजार ७७५ मुले शाळाबाह्य आहेत. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. गावखेड्यांत एक हजार ४१८ बालके शाळाबाह्य आहेत. यात ७०१ मुलींचा समावेश आहे.