शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीशकालीन सात पुलांच्या वाहतुकीसाठी ठाणो जिल्हा प्रशासन सतर्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 21:11 IST

इंग्रज राजवटीतील सुमारे सात पूल आजही जिल्ह्यात तग धरून उभे आहेत. एक शतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या पुलांवर आजही रहदारी आहे. मात्र, तीन पूल अवजड वाहनांसह हलक्या वाहनांसाठीदेखील बंद केले आहेत. परंतु, तरीही लोकांची त्यावरून येजा सुरूच आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे -  इंग्रज राजवटीतील सुमारे सात पूल आजही जिल्ह्यात तग धरून उभे आहेत. एक शतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या पुलांवर आजही रहदारी आहे. मात्र, तीन पूल अवजड वाहनांसह हलक्या वाहनांसाठीदेखील बंद केले आहेत. परंतु, तरीही लोकांची त्यावरून येजा सुरूच आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून ही रहदारीदेखील बंद करावी की काय, हा विचारविनिमय बांधकाम विभागात जोरदारपणो सुरू आहे.एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेमुळे ब्रिटिशकालीन पुलांकडे बांधकाम खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात आजमितीस सात पूल आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यात दोन, शहापूर तालुक्यातील कसारा गावात दोन, कल्याणमधील दोन आणि वाडा-मनोर-पालघर रस्त्यावरील सूर्या नदीवरील पूल ब्रिटिशकालीन असल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. यातील तीन पुलांवरून आजही वाहतूक सुरळीत सुरू आहे. यामध्ये भिवंडीतील कामवारी नदीवरील पुलासह सूर्या नदीवरील पूल आणि उल्हास नदीवरील रायता पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहतुकीसाठी सुरू असलेल्या या पुलांकडे बांधकाम विभागाने आता लक्ष केंद्रित केले असून जिल्हा प्रशासनातही त्यावर जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. भिवंडीला लागून असलेला सैतानी पूल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 621 वर तो आहे. कर्जत, कल्याण व भिवंडीजवळून हा महामार्ग जव्हारच्या दिशेने पुढे जातो. भिवंडीलाच लागून असलेला कामवारी नदीवरील पूल ब्रिटिशकालीन आहे. 1929 मध्ये बांधलेला हा पूल वाहतुकीस योग्य आहे, पण लवकरच त्यावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. त्याला लागूनच नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याचे कार्यकारी अभियंता जिभाऊ गांगुर्डे यांनी लोकमतला सांगितले. कल्याण खाडीवरील दुर्गाडी किल्ल्यास लागूून असलेला पत्रीपूल काही वर्षापासून सर्वच प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. बाजूलाच नवा पूल तयार केला असून त्यावरून वाहतूक सुरू आहे. तर, उल्हास नदीवर रायते गावाजवळील पूल 1947 मध्ये बांधलेला आहे. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल सुस्थितीत असून वाहतूक सुरू आहे. सूर्या नदीवर वाडा-पालघर-मनोर महामार्गावरील पूल 1941 मध्ये बांधलेला आहे. त्यावरील अवजड वाहतूक बंद करून नवीन पुलावरून ती सुरू आहे.     शहापूर तालुक्यातील कसारा गावात दोन काँक्रिटचे ब्रिटिशकालीन पूल आहेत. कमानीचे बांधकाम असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलाची मुदत सुमारे 1क् वर्षापूर्वीच संपलेली आहे. त्यावरील अवजड वाहतूक काही वर्षाआधीच बंद केली होती. आता हलक्या वाहनांसाठीदेखील हा पूल एक वर्षापासून बंद केला आहे. दुसरा पूल सुस्थितीत असल्यामुळे त्यावरून सुरळीत वाहतूक सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले. त्या सर्वच पुलांचे पुन्हा स्ट्ररल ऑडिट करण्याच्या मानसिकतेत बांधकाम विभाग असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन विचारविनिमय करत आहे.