शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ४२ टक्यांवर, आजच्या घडीला ८३८ जणांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:05 IST

ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ४२ टक्यांवर आले असून ही ठाणेकरांसाठी दिलासादायक च बातमी आहे.

ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही ठाण्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. परंतु दुसरीकडे आता लक्षणे नसलेले रुग्ण आता सात दिवसात बरे होऊन घरी जात आहेत. त्यानुसार शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २० टक्यांवरुन ४२ टक्यांवर आले आहे. सोमवार पर्यंत ८३८ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर याच कालावधीत २ हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत असले तरी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १२०० आसपास आहे.             ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी १०० ते कधी १५० रुग्ण शहरात आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. परंतु आता क्वॉरन्टाइन केलेल्या रुग्णांची संख्यमुळेच कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे ही देखील काहीशी शहरासाठी समाधानकारक बाब म्हणावी लागणार आहे. शहरात आजच्या घडीला २ हजाराहून अधिक रुग्ण हे कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यातील ८३८ हून अधिक रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे मागील काही दिवसांपूर्वी २० टक्यांच्या आसपास होते, तेच आज प्रमाण हे ४२ टक्यांपर्यंत आले आहे. ही ठाणेकरांसाठी आनंदाची किंबहुना समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे. तर मृतांचा आकडा हा आजच्या घडीला ६७ वर गेला आहे. परंतु मृतांमध्येही ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. ज्यांचे वय ६० हून अधिक आहे, ज्यांना इतर आजारांच्या व्याधी आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण मृतांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ही देखील समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे.दुसरीकडे कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका स्तरावर प्रयत्न सुरु असून नागरीकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी ठाणेकरांनी घाबरुन जाण्याचे कारण नसले तरी काळजी मात्र घेणे गरजेचे असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातही आता ज्यांनी सौम्य लक्षणे दिसत असतील अशांतर आता घरीच उपचार घेण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे. परंतु झोपडपटटी भागात राहणाºया नागरीकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या