शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात २० लाखांच्या इफेड्रीनसह एकाला अटक: ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:36 IST

सुडो इफेड्रीनच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या प्रविण पवार याच्याकडून २० लाखांचे इफेड्रीन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने सोमवारी रात्री हस्तगत केले. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देखारटन रोड भागातून घेतले ताब्यातमंगळवारी पहाटे पोलिसांची कारवाईठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: सुडो इफेड्रीनच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या प्रविण पवार (२५, रा. पिंपळदरी, जि. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने मंगळवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास खारटन रोड परिसरातून अटक केली. त्याच्याकडून २० लाखांचे अर्धा किलो सुड्रो इफेड्रीन जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्यातील सिडको बस थांब्याजवळ इफेड्रीन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी प्रविण पवार हा येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, अविराज कु-हाडे, अमोल वालझडे आणि संदीप बागूल आदींच्या पथकाने खारटन रोड परिसरात २३ जुलै रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. त्यावेळी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या प्रविणला युनिट-१ च्या पथकाने कळवा नाक्याच्या दिशेने जाणा-या रोडवर कॅफे डाईन हॉटेलच्या समोरुन ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये अर्धा किलोची सुडो इफेड्रीन पावडरही हस्तगत करण्यात आली.  पवार याच्याविरुद्ध मंगळवारी पहाटेपर्यंत ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि अटकेची कारवाई करण्यात आली. त्याला ठाणे न्यायालयाने ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. त्याने हे इफेड्रीन कुठून आणले? ते कोणाला विकले जाणार होते? त्याचे आणखी कोणते साथीदार यामध्ये आहेत? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाDrugsअमली पदार्थ