शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ठाणेकरांनो मोफत वायफायसाठी ५ दिवसानंतर मोजा पैसे, प्रायोगिक तत्त्वावर झाली दोन लाख ग्राहकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:37 IST

दोन लाख ग्राहकांनी ठाणे महापालिकेच्या प्रायोगिक तत्वावरील मोफत वायफाय सेवेचा फायदा घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ही सेवा पुढील पाच दिवसात प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ही सेवा हवी असल्यास ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देठेकेदाराबरोबर पालिका उघडणार एस्क्रो अकाऊंट८०० केबीपीएसनंतरचे दर मात्र गुलदस्त्यात

ठाणे : ठाणे शहर वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून आता संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट केले जाणार आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या सेवेअंतर्गत आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु, आता या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील चार दिवसानंतर ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, ही सेवा मार्केट रेटपेक्षा कमी दरात उपलब्ध असेल असा दावा महापालिकेने केला असला तरी हे दर किती असतील हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.महापालिकेमार्फत वायफायचा हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभगातून राबविला जात आहे. त्यामुळे यासाठी पालिकेला एकही पैसा खर्च न करता, उलट खाजगी ठेकदाराकडून पालिकेला वार्षिक ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा आर्थिक फायदा होणार आहे. स्मार्टसिटी एक भाग म्हणून आणि ठाणेकरांना इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी मागील वर्षी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे पाऊल उचलले होते. वायफायची यंत्रणा बसविण्यासाठी महापालिकेच्या ३२ हजार ५०० विद्युत पोलचा वापर केला जात आहे. वायफाय सिस्टममध्ये महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबधींत एजेन्सीला विद्युत पोल उपलब्ध करुन देणार आहे. त्यानुसार ज्यांना या वायफायची सुविधा घ्यायची असेल त्यांना सुरुवातीला १०० रुपये तेही एकदाच मोजावे लागणार आहेत. यामध्ये ८०० केबीपीएसपर्यंत इंटरनेट मोफतअसून त्यापुढील वापरासाठी चार्जेस द्यावे लागणार आहेत. यातून जे उत्पन्न मिळणार आहे. त्यातील १४.२३ टक्के हिस्सा अथवा ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपये हा पालिकेला मिळणार आहेत. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा मोफत दिली असून आतापर्यंत २ लाख ठाणेकरांनी याचा फायदा घेतल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.परंतु आतापुढील चार दिवसानंतर महापालिका संबधींत ठेकेदाराबरोबर एस्क्रो अकाऊंट ओपन करणार आहे. त्यावर महापालिकेचे हक्क असणार आहेत. म्हणजेच जे ग्राहक या वायफाय सेवेचा लाभ घेणार आहेत. त्याची नोंदणी या अकाऊंटमधून होणार आहे. तसेच येणारे पैसेदेखील याच अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर संबधींत ठेकेदाराला त्याचा हिस्सा देणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार हे अकाऊंट ओपन झाल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसात प्रत्यक्षात या सेवेला सुरुवात होणार असून ग्राहकांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच नवे प्लॅनही जाहीर केले जाणार आहेत. परंतु, हे प्लॅन अद्यापही गुलदस्त्यातच ठेवले आहेत. त्यामुळे ८०० केबीपीएसनंतर ठाणेकरांच्या खिशाला किती भुर्दंड पडणार हे मात्र अद्यापही निश्चित झालेले नाही. असे असले तरी ही सेवा मार्केटमधील इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी दर आकारणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWiFiवायफाय