Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे आज ८८७ रुग्ण आढळले; ६१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 09:18 PM2021-05-21T21:18:29+5:302021-05-21T21:18:42+5:30

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख सात हजार ३१६ बाधीत व आठ हजार ७६८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

Thane Corona Updates 887 corona patients found in Thane district today 61 death | Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे आज ८८७ रुग्ण आढळले; ६१ जणांचा मृत्यू

Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे आज ८८७ रुग्ण आढळले; ६१ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ८८७ रुग्ण शुक्रवारी आढळले आहे. गेल्या २४ तासात ६१ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख सात हजार ३१६ बाधीत व आठ हजार ७६८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरात आज १६९ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख २७ हजार ४५५ रुग्णांची व एक हजार ८४६ मृतांची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवलीत २१५ रुग्ण सापडले असून २२ मृत्यू झाले आहे. येथील एकूण एक लाख ३१ हजार २४६ बाधितांसह एक हजार ७९० मृतांची नोंद करण्यात आली आहे.

उल्हासनगरमध्ये १७ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण १९ हजार ८९८ रुग्णांची व ४६४ मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत १२ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार २८६ व ४२८ मृत्यू आजपर्यंत नोंदले  आहेत. मीरा भाईंदरला दिवसभरात १२७ बाधितांसह सात मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आजपर्यंत ४५ हजार ८२२ बाधीत व एक हजार २३१ मृतांची नोंद करण्यात आली. 

   अंबरनाथला २८ बाधीत आज सापडले असून तिघांचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्ण संख्या १८ हजार ७१ बाधीत व ४०१ मृत्यू झाले आहेत. कुळगांव बदलापूर नगर परिषदेत ४४ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील २० हजार २७२ बाधितांची व २३३ मृतांची नोंद आजपर्यंत झाली. ग्रामीण गांवपाड्यांत आज १३६ रुग्णांसह नऊ मृत्यू झाल्याचे आढळून आले.  या परिसरातील बाधितांची संख्या ३४ हजार २४९ व ८३१ मृत्यू नोंदले गेले आहेत

Web Title: Thane Corona Updates 887 corona patients found in Thane district today 61 death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.