शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ‘डांबर’ट ठेकेदारांना लगाम, खोदकामाची परवानगी कुणालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 04:30 IST

ठाणे : ठेकेदारांकडून रस्ते तयार करताना होणाऱ्या डांबराच्या चोरीमुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन प्रशासनाला नाहक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा डांबरट ठेकेदारांना लगाम घालण्यासाठी यापुढे शहरातील नवे रस्ते यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटचेच करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी घेतला.रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, हा यामागचा उद्देश ...

ठाणे : ठेकेदारांकडून रस्ते तयार करताना होणाऱ्या डांबराच्या चोरीमुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन प्रशासनाला नाहक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा डांबरट ठेकेदारांना लगाम घालण्यासाठी यापुढे शहरातील नवे रस्ते यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटचेच करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी घेतला.

रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, हा यामागचा उद्देश असून तसे आदेश आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. यंदा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे काही केल्या बुजवले जात नाहीत. त्यासाठी प्रशासन नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे. आयुक्तांपासून महापौर, पालकमंत्र्यांना रस्त्यांवर उतरण्याची नामुश्की ओढवली. आयुक्तांनी स्वत: रात्रीच्यावेळी शहरातील रस्त्यांवर उतरून खड्डे बुजवण्याचे काम करून घेतले. तरीही रस्त्यांची अवस्था दयनीय असून, ठेकेदारांच्या चुकीमुळे पालिका प्रशासनालाच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी यापुढे कोणतेही नवीन रस्ते हे डांबरी करणार नसल्याचा निर्णय घेतला. यावेळी आणखी काही निर्णय घेण्यात आले. त्यानुसार रस्त्याचे काम करताना मलनि:सारण, गटार, पाणीपुरवठा, विद्युत, दूरसंचार विभाग, महानगर गॅस, महावितरण या विभागांना सेवावाहिन्यांसाठी आधीच परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.रस्त्याचे काम झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खोदकामासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याच्या सूचना बैठकीमध्ये अधिकाºयांना दिल्या. रस्त्याचे काम झाल्यानंतर सेवावाहिन्यांच्या कामांसाठी रस्ते खोदले जातात. त्यामुळे रस्ते पुन्हा खराब होऊन खड्डे पडतात.ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत जे रस्ते यापुढे बनवण्यात येणार आहेत, ते सर्व रस्ते सिमेंट किंवा यूटीडब्ल्यूटीमध्ये बनवण्याबरोबरच त्या रस्त्यांना सेवावाहिन्यांसाठी डक्ट बनवणेही बंधनकारक असणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा