शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या कोपरीमध्ये एकाच दिवशी दोघांनी केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:47 IST

सुभाष पवार (३८) आणि विवेक अय्यपन (२७) या दोघांनीही आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना ठाण्यात मंगळवारी घडल्या. सुभाषला अपत्यप्राप्ती नसल्याने तसेच कौटंूबिक कलहातून तर विवेकने एकतर्फी प्रेमातून आपले जीवन संपविले.

ठळक मुद्देएकाने कौटूंबिक कलहातूनतर दुसऱ्याने एकतर्फी प्रेमातून घेतला गळफासकोपरी पोलीस ठाण्यात नोंद

ठाणे : कोपरी परिसरात मंगळवारी एकाच दिवशी सुभाष पवार (३८) आणि विवेक अय्यपन (२७) या दोघांनीही आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. सुभाषला अपत्यप्राप्ती नसल्याने आणि विवेकने एकतर्फी प्रेमातून हे पाऊल उचलल्याची शक्यता प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली आहे.सुभाष हा कोपरीतील आनंदनगर झीरो गल्ली येथे वास्तव्याला होता. त्याने २१ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घरातील छताला गळफास घेतला. त्याच्या लग्नाला १२ वर्षे झाली होती. पण, अपत्यप्राप्ती नव्हती. शिवाय, तो कर्जबाजारीही होता. त्यातूनच दारूच्याही आहारी गेला होता. पत्नीशीही त्याचे वाद होत होते. अशा अनेक कारणांनी तो वैफल्यग्रस्त होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोपरीतील गुरुकृपा सोसायटीतील विवेक अय्यपन यानेही घरातच नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्याने आईवडील आणि मित्रांसाठी अशा दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या हिंदीमध्ये लिहून ठेवल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या विवेकचे १० वर्षांपूर्वी तामिळनाडूतील एका तरुणीबरोबर प्रेम होते. १० वर्षांपासून त्याचे तिच्यावर प्रेम असूनही तिचा मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. यातूनच आईवडील आणि मित्रांची माफी मागून आपण आत्महत्या करत असून त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, असेही त्याने या चिठ्ठ्यांमध्ये म्हटले आहे. याप्रकरणीही चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड यांनी सांगितले.--------------------------------

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसSuicideआत्महत्या