शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ठाण्याचा कोस्टल रोड अखेर दृष्टिपथात , १२५१ कोटींचा खर्च अपेक्षित; ठामपाकडून आराखडा एमएमआरडीएला सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 01:26 IST

Thane Coastal Road : या मार्गामुळे घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

ठाणे  : गेल्या कित्येक वर्षांपासून कागदावर असलेला मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंतचा कोस्टल रस्ता आता खऱ्या  अर्थाने मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाणे महापालिकेने या रस्त्याचा आराखडा तयार करुन एमएमआरडीएकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे १३ किमीचा मार्ग हा काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी असणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी एक हजार २५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. कित्येक वर्षांपासून हा कोस्टल रोड होणार की इतिहासजमा होणार, यावरूनदेखील उलटसुलट चर्चा होती. परंतु, आता महापालिकेने आराखडा तयार करून सर्वांनाच धक्का दिला आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू  असते. त्याचबरोबर या शहरातून बंदराच्या दिशेनेही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यापैकी जेएनपीटी बंदर ते गुजरात या मार्गावरील वाहने घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्याही मोठी आहे. यामुळे ठाण्यातील माजिवाडानाक्यापासून ते घोडबंदर टोलनाक्यापर्यंत वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्यांना कोंडीचा फटका बसत असून याबाबत त्यांच्याकडून संतापही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोस्टल मार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती.

घोडबंदरची वाहतूककोंडी सोडवण्यास होणार मदतठाणे : नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंत असा हा मार्ग असणार आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक सोडली जाणार आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये घोषणेपलीकडे काहीच झाले नव्हते. दरम्यान, ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या प्रकल्पाचा आढावा घेऊन त्याच्या प्रकल्प आराखड्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तो तयार करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठविला आहे. हा मार्ग सुमारे १३ किमीचा असणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याुनसार ४० ते ४५ मीटरचा आठ पदरी रस्ता असणार आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. १.१३ किमीचा उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका असा हा मार्ग असणार आहे. एकूण मार्गापैकी ७.२९ किमीचा मार्ग सीआरझेड भागातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी एक हजार २५१ कोटी रुपयांचा खर्च आहे. त्यानुसार आता एमएमआरडीए याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असून, त्यानंतर या रस्त्याचे भवितव्य दृष्टीपथात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणे