शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु, ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रु ग्णांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:21 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार शहारात २० ठिकाणी हे विभाग सुरु करण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोनाची लक्षणे आढळणाºयांची नोंदणी केली जाणार आहे.

ठाणे : ठाणे शहरात कोरोना या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी आणि रु ग्णांची तात्काळ तपासणी करणे सोयीस्कर व्हावे यासाठी ठाणे शहरामध्ये प्रभाग समितीनिहाय १५ महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये तर ५ खासगी रूग्णालये अशा एकूण २० ठिकाणी ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. या बाह्यरूग्ण विभागामध्ये केवळ ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणाऱ्या रु ग्णांचीच तपासणी करण्यात येणार आहे. ठाणे शहरात कोरोना या आजाराच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही पाठपुरवठा केला होता.             प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभागात महापालिकेच्या १५ आरोग्य केंद्राचा समावेश आहे. यामध्ये कौसा आरोग्य केंद्र, दिवा केंद्र, कळवा आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, किसननगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, नौपाडा आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, काजुवाडी आरोग्य केंद्र, कोपरी आरोग्य केंद्र, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, गांधीनगर आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य केंद्र, आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्र या महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे तर कौशल्या हॉस्पीटल, ठाणे ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पीटल, ठाणे वेदांत हॉस्पीटल, जितो एज्युकेशनल अ‍ॅन्ड मेडिकल ट्रस्ट या ५ खाजगी हॉस्पिटलमध्ये ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.ताप बाहयरु ग्ण विभाग सुरू केलेल्या आरोग्य केंद्रांमधील जनरल ओपीडी पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येणार असून सदर विभाग दैनंदिन सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत कार्यान्वित राहणार आहेत. तसेच महापालिका दवाखान्यांमध्ये अँटीरेबिज उपचार आणि आरोग्य केंद्रातील इतर लसीकरणासाठी आदी उपचार दुपारी २ नंतर सुरु ठेवण्यात येणार आहेत.ताप बाहयरु ग्ण विभागाकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करण्यात येणार नसून याठिकाणी केवळ ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणार्या रु ग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रातील रु ग्णांचे कमी स्वरूपाची लक्षणे, मध्यम स्वरूपाची लक्षणे आणि अतिशय तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारे रूग्ण तीन विभागामध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे.वैद्यकिय अधिकारी त्यांच्या वैद्यकिय अहवालानुसार रु ग्णांची वर्गवारी केल्यानंतर ज्या रु ग्णांची कोविड तपासणी करणे आवश्यक आहे अशा रु ग्णांना (कॅटॅगरी १ माईल्ड केसेस) भार्इंदरपाडा येथील कोरोना केअर सेंटर येथे अ‍ॅम्ब्युलन्सव्दारे पाठविण्याचा निर्णय घेतील. भार्इंदरपाडा येथे सदर रु ग्णांना दाखल करु न त्यांचे स्वॅब घेण्यात घेवून या ठिकाणी या रु ग्णांना त्यांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत ठेवण्यात येणार आहे. हे रु ग्ण कोविड पॉझटिव्ह आढळल्यास त्यांना पुढील उपराचारार्थ सिव्हील हॉस्पिटल ठाणे किंवा होरायझोन प्राईम हॉस्पिटल, पातलीपाडा येथे प्राधिकृत कोविड रु ग्णालयामध्ये दाखल करण्यात येईल. फिव्हर ओपीडीमध्ये आलेल्या कॅटॅगरी २ व ३ मधील रु ग्णांना पुढील उपचारार्थ व तपासणीकरीता त्यांच्या क्षमतेनुसार बेथनी हॉस्पिटल, पोखरण किंवा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे संदर्भीत करण्यात येणार आहे. बेथणी हॉस्पिटल व छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे रु ग्णांची थ्रोट स्वॅब व्दारे तपासणी करु न पुढील निदान करण्यात येणार आहे.फिव्हर ओपीडी मध्ये आलेल्या रु ग्णांकरीता स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात येणार असून रजिस्टरमध्ये रु ग्णाचे नाव संपूर्ण पत्ता, संपर्कतपशिल आदी माहिती घेण्यात येणार आहे. ज्या रु ग्णांना संदर्भसेवा देणे आवश्यक नसेल अशा रु ग्णांना ओपीडीमधूनच औषधोपचार दिला जाणार आहे. फिव्हर ओपीडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जनरल ओपीडी मधील रु ग्णांचा समावेश होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रु ग्णांना संदर्भीत करण्याकरीता प्रभाग समिती निहाय १ अम्ब्युलन्स उपलब्ध करु न देण्यात आली असून फिव्हर ओपीडीमध्ये रु ग्णांची तपासणी करताना वैद्यकिय अधिकारी आणि रु ग्णांना संदर्भसेवा देताना अ‍ॅम्ब्युलन्सवरील सर्व कर्मचाऱ्यांनी देखील पीपीई किटसचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या