शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांना नवीन वाहने मिळाली; गुन्हेगारांची आता खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:10 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शहर पोलिस दलाला नविन वाहनांचे वितरण

ठाणे:- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना आधुनिक सुसज्ज वाहने उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या घरांचा देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलण्यात आल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हा नियोजन निधीतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला १८ चारचाकी आणि १९ दुचाकी वाहने देण्यात आली. त्यांचा वितरण सोहळा पालकमंत्री श्री.शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत येथील साकेत पोलीस कवायत मैदानावर झाला. त्यावेळी मंत्री श्री.शिंदे बोलत होते.

यावेळी महापौर नरेश म्हस्के, आमदार गणपत गायकवाड, रईस शेख, ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस सहआयुक्त सुरेश कुमार मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार आदी उपस्थित होते.

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या १३ वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची पत्रे श्री.शिंदे आणि श्री.आव्हाड यांच्या हस्ते यावेळी देण्यात आली.

पालकमंत्री श्री.शिंदे म्हणाले, पोलीस आपली काळजी घेतात आपण देखील त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठलाही सण, उत्सव असो पोलीस सदैव कर्तव्यासाठी रस्त्यावर असतात. सामान्य नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते चोख सेवा बजावतात. कोरोना काळात कर्तव्य बजावताना  निधन झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती देण्याची पोलीस आयुक्तांनी केलेली कार्यवाही अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीसांची काळजी घेताना त्यांच्यासाठी घरांची निर्मिती झाली पाहिजे यासाठी सिडको गृहनिर्माण प्रकल्पाच्या सोडतीमध्ये पोलीसांसाठी विशेष कोटा असावा असा निर्णय नगरविकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. निवृत्तीनंतर पोलीसांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात अभ्यास सुरु असून खाजगी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये काही सदनिकांच्या माध्यमातून पोलीसांना घरे उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक दृष्टीने पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या वसाहतींचा पुर्नविकास गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून करण्यात यावा असे सांगतानाच पोलीस ठाण्यामध्ये  आलेल्या तक्रारदाराला सौजन्याची वागणूक पोलीसांनी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर वचक बसवितानाच सामान्यांचा विश्वास वृध्दींगत होईल यासाठी पोलीसांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस आयुक्तालयाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहनेांच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास ही श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यावेळी म्हणाले, पोलीसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वाहने सुस्थितीत असणे अत्यावश्यक आहे. आज वितरीत करण्यात आलेल्या वाहनांमुळे पोलीस दलाला सक्षम करण्याचा प्रयत्न असून भविष्यातही अशाच प्रकारे सुसज्ज वाहने पोलीसांना उपलब्ध करुन दिली जातील. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर तातडीने नियुक्ती देण्याचे काम ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे. त्याचे अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयानीही करावे,असे आवाहन श्री.आव्हाड यांनी  यावेळी केले.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला जिल्हा नियोजन निधीतून दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यामाध्यमातून १८ चारचाकी आणि १९ दुचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देणारे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय पहिले असल्याचे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी मंत्री श्री. शिंदे व आव्हाड यांनी नविन वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. या वाहनांच्या माध्यमातून संचलन करण्यात आले. 

टॅग्स :Policeपोलिस