शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ५८ जणांना संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:07 IST

शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात व्हीआयपी आणि राजकीय पुढा-यांसह व्यावसायिक अशा ५८ जणांना ठाणे शहर पोलिसांकडून संरक्षण दिले गेले आहे.

पंकज रोडेकरठाणे : शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात व्हीआयपी आणि राजकीय पुढा-यांसह व्यावसायिक अशा ५८ जणांना ठाणे शहर पोलिसांकडून संरक्षण दिले गेले आहे. यामध्ये सर्वाधिक संरक्षण ठाणे शहर आणि उल्हासनगर येथील प्रत्येकी १३-१३ जणांना आहे. त्या ५८ जणांपैकी स्वसंरक्षणार्थ शुल्क भरण्याची तयारी अवघ्या १७ जणांची आहे. तसेच काही वर्षांपासून संरक्षण शुल्काची मोठी रक्कम थकीत आहे. मात्र, तिची माहिती गोपनीय असल्याचे सांगून ती देणे पोलिसांनी टाळले. तर वागळे इस्टेट या एकमेव परिमंडळातील सर्वच १० जणांना नि:शुल्क संरक्षण पुरविल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने नागरीकरण होत आहे. याचदरम्यान, बिल्डर, हॉटेल व्यावसायिक हे स्वसंरक्षणार्थ पोलीस बंदोबस्त मागून घेतात. तर काही टोळ्यांकडून व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या येत आहेत. त्या गोष्टींचे गांभीर्य लक्षात ठेवूनच पोलिसांकडून त्यांनाही संरक्षण देण्यात येत आहे.ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथील तीन खासदारांसह शहर आयुक्तालयातील १२ आमदार आणि बांधकाम, हॉटेल आदी व्यावसायिक, पत्रकार, कोर्ट, वकील अशा ५८ जणांना दिवस-रात्र पोलीस संरक्षण दिले आहे. तर उर्वरित ४१ जणांना स्थानिकांकडून तसेच रवी पुजारी यासारख्या इतर टोळीकडून धमक्या आलेल्या आहेत. त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना संरक्षण पुरवले आहे. संरक्षण मिळावे, यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. प्रत्येकाला ते मिळते असे नाही. आलेल्या प्रत्येक अर्जाची पडताळणी होते. त्याला खरंच गरज आहे का हे पाहून त्यानंतर कोणाला सशुल्क आणि नि:शुल्क संरक्षण द्यावे याचा निर्णय घेतला जातो. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षेखालील या समितीच्या निर्णयानुसार हे संरक्षण दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.७ जणांना विशेष सुरक्षापोलिसांकडून ७ जणांना झेड वन, वाय आणि एक्स अशा स्वरुपाची सुरक्षा दिली आहे. यामध्ये दोघांना झेड वन, दोघांना झेड आणि तिघांना वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे.असे दिले जाते संरक्षणजसा दर्जा असले तशी फौज दिले जाते. यामध्ये कारचा समावेश आहे. तर सुरक्षा मागणाºया किंवा दिलेल्या संंबंधीतासोबत तसेच त्याच्या घराबाहेर पोलीस दिले जाते. तसेच दर तीन महिन्यांनी संरक्षण देणाºयांची पुन्हा चाचपणी करून त्याला गरज आहे का? याची पाहून करून ती वाढवावी की कमी करावी,यावर निर्णय घेतला जातो.त्यानुसार संरक्षण पुरविण्यात येत असे सूत्रांनी स्पष्ट केले.ज्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहेत. त्यांच्याकडून संबंधित पोलिसाचा दिवसभराचा पगार म्हणून रक्कम घेतली जाते. ही रक्कम साधारणत: १,६९७ रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे संरक्षण दिलेल्यांनी नंतरही पैसेही अदा केलेले नाहीत. तर काही जणांनी ते माफ करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना न्यायालयाने पैसे भरण्यास सांगितले आहे. या थकीत रक्क मेबाबत गोपनीय बाब असल्याचे सांगून माहिती देणे टाळले आहे.

टॅग्स :thaneठाणे