शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द, ठाणेकरांसाठी आनंद वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:28 IST

मागील काही दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणेकरांची पाणी कपात तुर्तास रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे.

ठळक मुद्देबुधवारी केली जात होती कपातपावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा कपात

ठाणे - मागील काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरु होते. परंतु आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी ठाणेकरांना जोपर्यंता पाऊस आहे, तो पर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही.              ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा २४ ते ३० तास बंद ठेवण्यात येत होता. यंदा तर ही पाणी कपात सप्टेंबर २०१८ पासूनच लागू करण्यात आली होती. सुरवातीला १४ टक्के त्यानंतर २० टक्के आणि आता तब्बल ३० टक्के पाणी कपात ठाणे शहरात केली जात होती. परंतु त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात होता. पाण्याच्या या कपातीवरुन महासभेतही अनेक वेळा आवाज उठविण्यात आला होता. पाण्यासाठी आंदोलनही झाल्याचे पहावयास मिळाले होते.दरम्यान आता मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस असा पडत राहिला तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु मागील काही दिवसापासून पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. जो पर्यंत पावसाची अशीच कृपा राहिल तो पर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेच्या सुत्रांचे म्हणने आहे. अद्याप धरणांच्या पातळीत वाढ झालेली नाही, तलावांमध्येही पुरेसा पाणी साठा नाही. परंतु सलग पडणाऱ्या पावसामुळे हा दिलासा दिला जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात करावी लागेल असेही पालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी