शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Thane: कळवा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 22:45 IST

Eknath Shinde: प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. 

रुग्णांच्या मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कळवा येथील रुग्णालयाला मुख्यमंत्री एकनाथ यांनी आज भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कळवा रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये पाहणी केली. रुग्णलयाच्या नातेवाईकांना भेटलो. १८ लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्या प्रकरणात चौकशी समिती गठीत केली आहे. ही समिती ९ जणांची असून,  या समितीला तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. तसेच पुढील अहवालावरून कारवाई होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, हे रुग्णालय ५०० बेडसचे आहे. सध्या ६०० रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. आजही लॉबीमध्ये कॉट टाकून रुग्णांवर उपचार होताना मी पाहिले आहे. जागा नाही म्हणून आलेल्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णलयात डॉक्टर पाठवत नाहीत. या रुग्णलयावर रुग्णाचा विश्वास आणि भार मी पाहिला आहे. ही घटना झाल्यानंतरसुद्धा ९१ रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच २२ रुग्णावर शस्त्रक्रिया झाली, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

या रुग्णालावरील भार पाहिल्यानंतर जे काम डॉक्टर आणि कर्मचारी करताहेत त्यांचं मानसिक खच्चीकरण होता कामा नये. डॉक्टर जीव लावून रुग्णांवर उपचार करण्याचं काम करत असतो. मी आयसीयूमध्ये जाऊन पाहणी करून आलो आहे. खाजगी रुग्णालयातून काही रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी आले आहेत. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मी बोललोय. या सगळ्यांनी उपचाराबद्दल समाधान व्यक्त केलं आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेhospitalहॉस्पिटल