शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे ते मंत्रालय धावणारी ठाणे परिवहनची बस अखेर होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:33 IST

उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असतांना आणि प्रवासी देखील नसतांना तोट्यात सुरु असलेली ठाणे (कॅडबरी) ते मंत्रालय ही टिएमटीची बस अखेर बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देप्रसिध्दी न केल्यानेच बसला प्रवासी नाहीकाही महिन्यातच बसचा गुंडाळला गाशा

ठाणे - लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर सुरु करण्यात आलेली ठाणे ते मंत्रालय ही ठाणे परिवहनची सेवा अखेर होणाºया तोट्यामुळे आणि प्रवाशांची संख्या कमी झाल्याने बंद करण्याची वेळ परिवहन प्रशासनावर आली आहे. ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी ठाणे परिवहन सेवेने सुरु केलेली ठाणे मंत्रालय हि बससेवा अखेर बंद करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक तसेच प्रवासीही या बसला नसल्याने शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ही बससेवा बंद झाल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी वातानुकूलित नसलेल्या आणि मुंबईहुन येणाऱ्या बेस्टच्या बसेसवर ठाणेकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.                           ठाणे परिवहन सेवेने खास कॅडबरी ते मंत्रालय अशी बससेवा खास ठाणेकरांसाठी सुरु केली. मात्र ही बस पूर्णपणे तोट्यात चालली असल्याचा महत्वाचा मुद्दा परिवहन सदस्य तकी चेऊलकर यांनी उपस्थित केला. १४४ क्रमांकाची असलेली ही बससेवा दीड महिन्यापूर्वी कॅडबरी पासून सुरु केली. केवळ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या या बससेच्या केवळ दोनच फेऱ्या सुरु होत्या. सकाळी ८ आणि संध्याकाळी साडेचार वाजता ठाण्यातून ही बस सुटते तर सकाळी १० आणि संध्याकाळी ६ वाजता मुंबईहून हि बस सुटते. परंतु जेव्हापासून ही बस सुरु झाली तेव्हापासूनच या बसला प्रवासी नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. बेस्टने सुध्दा ही सेवा यापूर्वीच बंद केली आहे.परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनी मात्र या बसची प्रसिद्ध व्यविस्थत न केल्याने प्रवाशी संख्या कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला.परिवहन सभापती अनिल भोर यांनी मात्र या बसचे रूट बदलून उत्पन्न वाढते का याची चाचपणी करावी अशी सूचना केली. मात्र बसला जर प्रवासी नाहीत त्यामुळे ही बस बंदच करावी अशी मागणी चेऊलकर यांनी केल्याने प्रशासनाने ही बस बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना भोर यांनी केली. प्रशासनाची बाजू मांडताना परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी मात्र ही बस प्रायोगिक तत्वावर सुरु केली होती. आता जर बसला प्रवासी नसतील तर ही सेवा बंद करण्यात येईल अशी माहिती त्यांनी या बैठकीमध्ये दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त