शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Thane: भाजपच्या ठाणे जिल्हा कार्यकारणीत मोठे फेरबदल, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

By अजित मांडके | Updated: August 30, 2023 17:18 IST

Thane: भाजपच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी संजय वाघुल यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारणी देखील बदलण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर या नव्या कार्यकराणीत ज्यांनी आधीच्या कालावधीत काम केले नसेल त्यांना घरी बसविले जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते.

- अजित मांडकेठाणे  - भाजपच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी संजय वाघुल यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारणी देखील बदलण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर या नव्या कार्यकराणीत ज्यांनी आधीच्या कालावधीत काम केले नसेल त्यांना घरी बसविले जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार नव्या कार्यकारणीत ६० टक्के नव्या चेहºयांना संधी देत ४० टक्के जुनेच चेहरे पुन्हा या कार्यकारणीत दिसून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदाच्या कार्यकारणीत ७० टक्के नवीन आणि ३० टक्के जुन्या चेहºयांना संधी देण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत ४ सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ट सेल संयोजक आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी काळातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संघटनात्मक जाळे मजबूत करण्यावर नव्या कार्यकारिणीचा भर राहील, अशी माहिती वाघुले यांनी दिली. भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी विशेष सभा झाली. भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाºयांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा सरचिटणीसपदी मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्षपदी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, विक्रम भोईर, राजेश गाडे, सागर भदे, रमेश आंब्रे, महेश कदम, विद्या शिंदे, वर्षा वसंत पाटील, श्रुती महाजन, हर्षराज नारंग, चिटणीसपदी गौरव सिंह, राजेश सावंत, संतोष साळुंखे, विजय भोईर, किशोर गुणीजन, रामकिसन जैस्वार, तृप्ती जोशी-पाटील, श्रुतिका कोळी-मोरेकर, माधुरी मेटांगे यांची, खजिनदारपदी सुदेश खारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी स्नेहा पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी सुरज दळवी, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुरेश पाटील, अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी नताशा निशांत, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी शरिफ शेख यांची नियुक्ती झाली आहे. तसेच इतर पदांच्या देखील नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  तसेच कोषाध्यक्षपदासाठी ज्या काही प्रभाग समितीनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात ७० टक्के नवीन तरुण चेहºयांना संधी देत ३० टक्के जुन्या चेहºयांना संधी देण्यात आल्याची माहिती वाघुले यांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणे