शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Thane: भिवंडीत श्रमजीवी संघटना आक्रमक, मनपा मुख्यालयाचे प्रवेशद्वार तोडून इमारतीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

By नितीन पंडित | Updated: March 4, 2024 18:35 IST

Bhiwandi News: मनपातील पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे,या कामगारांना कामगार कायद्यानुसार योग्य त्या सुविधा मिळाव्यात तसेच शहरातील आदिवासी वस्ती असलेल्या भागात मूलभूत सुविधा सुरळीत करण्यात यावी या व अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन केले.

- नितीन पंडितभिवंडी - मनपातील पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे,या कामगारांना कामगार कायद्यानुसार योग्य त्या सुविधा मिळाव्यात तसेच शहरातील आदिवासी वस्ती असलेल्या भागात मूलभूत सुविधा सुरळीत करण्यात यावी या व अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन केले.

सकाळी उन्हात रस्त्यावर बसलेल्या श्रमजीवी कार्यकर्त्यांकडे मनपा आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने अखेर श्रमजीवी संघटना आक्रमक होत सायंकाळी चार वाजता संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेलं लोखंडी गेट तोडून मुख्यालय प्रांगणात प्रवेश केला. त्यानंतर प्रवेशद्वारा समोरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मनपा मुख्याल्या समोरून उठणार नाहीत असा निर्धार या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या आंदोलनात श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,प्रवक्ता प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे, शहराध्यक्ष सागर देसक,कामगार संघटनेचे महेंद्र निरगुडा,महिला पदाधिकारी संगीता भोमटे,श्रमजीवी कार्यकर्ते मोतीराम नामखुडा,मुकेश भांगरे यांच्यासह श्रमजीवीचे कार्यकर्ते तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे